जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : सलून चालकाचा मुलगा पहिल्याच सामन्यात ठरला सुपरस्टार, बलाढ्य स्टॉयनिसनेही टेकले गुडघे

IPL 2022 : सलून चालकाचा मुलगा पहिल्याच सामन्यात ठरला सुपरस्टार, बलाढ्य स्टॉयनिसनेही टेकले गुडघे

Photo-IPL/BCCI

Photo-IPL/BCCI

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) राजस्थान रॉयल्सने लखनऊ सुपर जाएंट्सवर (Rajsthan Royals vs Lucknow Super Giants) रोमांचक विजय मिळवला आहे. आयपीएलच्या या मोसमातली पहिलीच मॅच खेळणारा युवा खेळाडू कुलदीप सेन (Kuldeep Sen) राजस्थानच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 11 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) राजस्थान रॉयल्सने लखनऊ सुपर जाएंट्सवर (Rajsthan Royals vs Lucknow Super Giants)  रोमांचक विजय मिळवला आहे. आयपीएलच्या या मोसमातली पहिलीच मॅच खेळणारा युवा खेळाडू कुलदीप सेन (Kuldeep Sen)  राजस्थानच्या विजयाचा शिल्पकार ठरला. लखनऊला शेवटच्या 2 ओव्हरमध्ये विजयासाठी 34 रनची गरज होती, तेव्हा प्रसिद्ध कृष्णाच्या एका ओव्हरला लखनऊने 19 रन काढल्या, त्यामुळे शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 15 रनची गरज होती. कुलदीप सेनने मात्र या ओव्हरमध्ये 11 रन देत राजस्थानला विजयी केलं. मार्कस स्टॉयनिस (Marcus Stoinis) 17 बॉलमध्ये 38 रनवर नाबाद राहिला, त्याने 2 फोर आणि 4 सिक्स मारले, पण त्याने कुलदीपच्या बॉलिंगसमोर गुडघे टेकले. सलून चालकाचा मुलगा 25 वर्षांच्या कुलदीप सेनला राजस्थान रॉयल्सनी त्याच्या 20 लाख रुपयांच्या बेस प्राईजवर आयपीएल लिलावात विकत घेतलं. अनेक अडचणींवर मात करत कुलदीपने क्रिकेटमध्ये नाव कमावलं. मध्यमगती बॉलर असलेला कुलदीप स्थानिक क्रिकेट मध्य प्रदेशकडून खेळतो. 14 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्याने 43 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय 18 टी-20 मध्ये त्याला 12 विकेट घेण्यात यश आलं आहे. मध्य प्रदेशच्या रिवा जिल्ह्याच्या हरिहरपूरमध्ये राहणाऱ्या कुलदीपने एक वेळ आर्थिक अडचणींचा सामना केला. कुलदीपचे वडील रामपाल सेन रिवामध्ये हेयर कटिंग सलून चालवायचे. घरची परिस्थिती हलाकीची असतानाही वडिलांनी त्याला पूर्ण पाठिंबा दिला. घरामध्ये पैशांची कमी असली तरी त्यांनी कुलदीपच्या क्रिकेट करियरला कायमच प्रोत्साहन दिलं. आयपीएल लिलावात पहिल्यादांच त्याच्यावर बोली लागली. पाच भावा-बहिणींमध्ये तिसऱ्या क्रमांकाच्या कुलदीपच्या मनात 2014 साली क्रिकेटमध्ये करियर करण्याचा विचार आला. त्याआधी तो रिवा शहरातच खेळायचा. पहिले त्याची रिवा क्रिकेट टीममध्ये निवड झाली, मग आपल्या क्षमतेच्या जोरावर त्याने 2018 साली रणजी ट्रॉफीमध्ये स्थान पटकावलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात