मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : रोहित- विराटच्या खराब फॉर्मवर सौरव गांगुलीची पहिली प्रतिक्रिया, BCCI अध्यक्ष म्हणाले...

IPL 2022 : रोहित- विराटच्या खराब फॉर्मवर सौरव गांगुलीची पहिली प्रतिक्रिया, BCCI अध्यक्ष म्हणाले...

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी न्यूज 18 ला दिलेल्या Exclusive मुलाखतीमध्ये रोहित आणि विराटच्या खराब फॉर्मवर पहिला प्रतिक्रिया दिली आहे. '

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 29 एप्रिल : आयपीएल स्पर्धेचा (IPL 2022) अर्ध्यापेक्षा जास्त सिझन संपला आहे. साखळी फेरीतील 70 पैकी 41 सामने संपले आहेत. त्यानंतरही रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) हे टीम इंडियातील सर्वात मोठे दोन खेळाडू रन काढण्यासाठी झगडत आहेत. भारतीय क्रिकेट टीमचे आधारस्तंभ असलेल्या रोहित आणि विराटला या सिझनमध्ये अद्याप एकही हाफ सेंच्युरी झळकावता आलेली नाही.

मुंबई इंडियन्सचा कॅप्टन असलेल्या रोहित शर्मानं 8 मॅचमध्ये 19.12 च्या सरासरीनं 153 रन केले आहेत. त्याचा 41 सर्वोत्तम स्कोर आहे. रोहितच्या खराब कामगिरीचा फटका मुंबई इंडियन्सलाही बसलाय. मुंबईला या सिझनमध्ये अद्याप एकही मॅच जिंकता आलेली नाही. आरसीबीकडून खेळणारा विराट कोहली (Virat Kohli) देखील या सिझनमध्ये चांगलाच झगडतोय. सलग दोन मॅचमध्ये पहिल्याच बॉलवर (Golden Duck) आऊट झालेल्या विराटनं 9 मॅचमध्ये फक्त 16 च्या सरासरीनं 128 रन केले आहेत. 48 ही त्याची आत्तापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आहे.

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी न्यूज 18 ला दिलेल्या Exclusive मुलाखतीमध्ये रोहित आणि विराटच्या खराब फॉर्मवर पहिला प्रतिक्रिया दिली आहे. 'ते महान खेळाडू आहे. मला खात्री आहे की ते लवकरच फॉर्ममध्ये येतील आणि रन करण्यास सुरूवात करतील. विराट कोहलीच्या मनात सध्या काय सुरू आहे हे मला माहिती नाही, पण तो लवकरच फॉर्म परत मिळवेल आणि रन करेल. तो एक ग्रेट खेळाडू आहे.' असं गांगुली यांनी यावेळी स्पष्ट केलं.

IPL 2022 : कुलदीपला पूर्ण बॉलिंग न दिल्यानं पंत वादात! अखेर द्यावं लागलं स्पष्टीकरण

'मी आयपीएल स्पर्धा पाहात आहे. सर्वच टीम चांगलं खेळत असून यापैकी कुणीही विजेतेपद मिळवू शकतात.  गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन नव्या टीमनं चांगला खेळ केला आहे. उमरान मलिकच्या बॉलिंगनं लक्ष वेधलं आहे. उमेश यादव आणि खलिल अहमद यांनीही चांगली बॉलिंग केलीय.पण, उमराननं या आयपीएलमध्ये आत्तापर्यंत भन्नाट बॉलिंग केली आहे,' असं गांगुलीनं सांगितलं.

First published:

Tags: BCCI, Cricket, Ipl 2022, Rohit sharma, Sourav ganguly, Virat kohli