Home /News /sport /

IPL 2022 : कुलदीपला पूर्ण बॉलिंग न दिल्यानं पंत वादात! अखेर द्यावं लागलं स्पष्टीकरण

IPL 2022 : कुलदीपला पूर्ण बॉलिंग न दिल्यानं पंत वादात! अखेर द्यावं लागलं स्पष्टीकरण

DC vs KKR: कुलदीप यादवनं (Kuldeep Yadav) तीन ओव्हर्समध्ये 14 रन देत 4 विकेट्स घेतल्या. दिल्लीचा कॅप्टन ऋषभ पंतनं (Rishabh Pant) कुलदीपला चौथी ओव्हर दिलीच नाही. त्याचा हा निर्णय चांगलाच वादग्रस्त ठरला.

    मुंबई, 29 एप्रिल : आयपीएल स्पर्धेतील (IPL 2022) गुरूवारी झालेल्या मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सनं कोलकाता नाईट रायडर्सचा (Delhi Capitals vs Kolkata Knight Riders) 4 विकेट्सनं पराभव केला. या मॅचमध्ये कुलदीप यादव (Kuldeep Yadav) 'प्लेयर ऑफ द मॅच' ठरला. त्यानं तीन ओव्हर्समध्ये 14  रन देत 4 विकेट्स घेतल्या. दिल्लीचा कॅप्टन ऋषभ पंतनं (Rishabh Pant) कुलदीपला चौथी ओव्हर दिलीच नाही. त्याचा हा निर्णय चांगलाच वादग्रस्त ठरला. अखेर मॅच संपल्यावर पंतला या निर्णयाचं स्पष्टीकरण द्यावं लागलं. पंत मॅचनंतर म्हणाला, 'कुलदीप शेवटची ओव्हर टाकेल असा आम्ही विचार केला होता. पण, नंतर बॉल खूप ओला राहात होता. तसंच बॉलची गती बदलण्यात यावी अशी माझी इच्छा होती. त्यामुळे मी फास्ट बॉलर्सना ओव्हर्स दिल्या. पण, ही रणनीती उपयोगी ठरली नाही.' कुलदीपनं गुरूवारच्या मॅचमध्ये 14 व्या ओव्हरनंतर बॉलिंग केली नाही. पंतनं या काळात ललित यादव, चेतन सकारिया, मुस्तफिजूर रहमान आणि शार्दुल ठाकूर हे बॉलर वापरले. या सर्वांनी 14 ते 19 ओव्हर्सच्या दरम्यान भरपूर रन दिले. पंतच्या या निर्णावर क्रिकेट तज्ज्ञांसह अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. कारण, कुलदीप ज्या पद्धतीनं बॉलिंग करत होता ते पाहता तो मॅचमध्ये पाच किंवा सहा विकेट्सही घेऊ शकला असता. IPL 2022 : ऋषभ पंतनं दाखवलं धोनीसारखं स्किल, श्रेयस अय्यरलाही धक्का! पाहा VIDEO पर्पल कॅपच्या शर्यतीमध्ये कुलदीप कुलदीप यादव या आयपीएल सिझनमध्ये चांगलाच यशस्वी ठरला आहे. कुलदीपनं या सिझनमध्ये केकेआर विरूद्धच्या दोन्ही मॅचमध्ये 4-4 विकेट्स घेतल्या. दिल्ली कॅपिटल्सनं आत्तापर्यंत 8 पैकी 4 सामने जिंकले असून या सर्व सामन्यांमध्ये कुलदीप यादवच 'प्लेयर ऑफ द सीरिज' आहे.  त्याचबरोबर सर्वाधिक विकेट्स घेण्यासाठी असलेल्या पर्पल कॅपच्या शर्यतीमध्ये कुलदीप सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. या शर्यतीमध्ये राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आघाडीवर असून त्यानं आत्तापर्यंत 18 विकेट्स घेतल्या आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, Delhi capitals, Ipl 2022, Kuldeep yadav, Rishabh pant

    पुढील बातम्या