मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2022 : रोहितच्या वक्तव्यानं वाढलं RCB चं टेन्शन, मुंबईच्या हाती आहे भवितव्य

IPL 2022 : रोहितच्या वक्तव्यानं वाढलं RCB चं टेन्शन, मुंबईच्या हाती आहे भवितव्य

आरसीबीची संपूर्ण टीम आणि फॅन्स  मुंबई इंडियन्सला  पाठिंबा देणार असले तरी रोहित शर्माच्या (Rohit Sharma) वक्तव्यामुळे आरसीबीचं टेन्शन वाढलं आहे.

आरसीबीची संपूर्ण टीम आणि फॅन्स मुंबई इंडियन्सला पाठिंबा देणार असले तरी रोहित शर्माच्या (Rohit Sharma) वक्तव्यामुळे आरसीबीचं टेन्शन वाढलं आहे.

आरसीबीची संपूर्ण टीम आणि फॅन्स मुंबई इंडियन्सला पाठिंबा देणार असले तरी रोहित शर्माच्या (Rohit Sharma) वक्तव्यामुळे आरसीबीचं टेन्शन वाढलं आहे.

मुंबई, 20 मे : रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं गुजरात टायटन्सवर (RCB vs GT) विजय मिळवत आयपीएल 2022 (IPL 2022) मधील आव्हान कायम ठेवलं आहे. आरसीबीनं या सिझनमध्ये 14 पैकी 8 सामने जिंकले आहेत. आरसीबीचे एकूण 16 पॉईंट्स झाले आहेत. या विजयानंतरही त्यांची 'प्ले ऑफ' मधील जागा निश्चित नाही. मुंबई इंडियन्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स (MI vs DC) या मॅचवर आरसीबीचं भवितव्य अवलंबून आहे.

आरसीबीचा रनरेट हा दिल्लीपेक्षा कमी आहे. त्यामुळे शनिवारी होणाऱ्या मॅचमध्ये दिल्लीनं मुंबई इंडियन्सचा पराभव केल्यास दिल्ली 'प्ले ऑफ' साठी पात्र होईल आणि आरसीबीचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. त्यामुळे शनिवारच्या मॅचमध्ये रोहित शर्माला (Rohit Sharma) पूर्ण पाठिंबा देण्याची घोषणा आरसीबीचा कॅप्टन फाफ डुप्लेसिसनं गुजरातवरील विजयानंतर केली आहे.

आरसीबीची संपूर्ण टीम आणि फॅन्स मुंबईला पाठिंबा देणार असले तरी रोहित शर्माच्या वक्तव्यामुळे आरसीबीचं टेन्शन वाढलं आहे. रोहित शर्मानं सनरायझर्स हैदराबाद विरूद्धच्या मॅचमध्ये हे वक्तव्य केलं होतं. 'आम्हाला या स्पर्धचा शेवट चांगल्या पद्धतीनं करायचा आहे. त्याचबरोबर शेवटच्या मॅचमध्ये काही नव्या खेळाडूंना आम्ही संधी देणार आहोत. त्यामुळे पुढील सिझनची तयारी आम्हाला सुरू करता येईल,' असे रोहितने सांगितले आहे.

Nikhat Zareen : नातेवाईकांचा विरोध, मेरी कोमशी वाद! मोठ्या संघर्षानंतर झाली वर्ल्ड चॅम्पियन

मुंबई इंडियन्ससाठी हा सिझन निराशाजनक ठरला आहे. मुंबईनं 13 पैकी फक्त 3 सामने जिंकले असून त्यांचं स्पर्धेतील आव्हान यापूर्वीच संपुष्टात आलं आहे. आता पुढील वर्षाच्या तयारीचा भाग म्हणून मुंबईची टीम उर्वरित सामने खेळत आहे. मुंबई इंडियन्समधील  अर्जुन तेंडुलकर, आर्यन जुयाल आणि राहुल बुद्धी या खेळाडूंना अद्याप एकदाही संधी देण्यात आलेली नाही. रोहितनं या नवोदीतांना संधी देण्यासाठी काही अनुभवी खेळाडूंना विश्रांती दिली तर त्याचा फायदा दिल्ली कॅपिटल्सला होणार आहे. त्यामुळे आरसीबीचं टेन्शन वाढलं आहे.

First published:

Tags: Cricket, Ipl 2022, Mumbai Indians, RCB, Rohit sharma