जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : मुंबई इंडियन्सला होम ग्राऊंडचा फायदा नाही, रोहित शर्माचा दावा!

IPL 2022 : मुंबई इंडियन्सला होम ग्राऊंडचा फायदा नाही, रोहित शर्माचा दावा!

IPL 2022 : मुंबई इंडियन्सला होम ग्राऊंडचा फायदा नाही, रोहित शर्माचा दावा!

आयपीएल स्पर्धेचा पंधरावा सिझन 26 मार्चपासून सुरू होणार आहेत. यंदा स्पर्धेत एकूण 10 टीम खेळणार आहेत. या टीममध्ये लीग स्टेजमधील 70 मॅच या मुंबई, नवी मुंबई आणि पुणे या तीन शहरांमध्ये होणार आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 24 मार्च : आयपीएल स्पर्धेचा पंधरावा सिझन 26 मार्चपासून सुरू होणार आहेत. यंदा स्पर्धेत एकूण 10 टीम खेळणार आहेत. या टीममध्ये लीग स्टेजमधील 70 मॅच या मुंबई, नवी मुंबई आणि पुणे या तीन शहरांमध्ये होणार आहेत. या तीन शहरांमधील वातावरण, तसंच पिचचं मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) मोठा फायदा होईल, असं मानलं जात आहे. मुंबईचा कॅप्टन रोहित शर्मानं (Rohit Sharma) ती शक्यता फेटाळून लावली आहे. रोहित शर्मानं बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत या विषयावरील प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं की, ‘मला खात्री आहे की तुम्ही मेगा ऑक्शन पाहिलं असावं. यंदा नव्या टीमचा समावेश झाला आहे. प्रत्येक टीममध्ये नवे खेळाडू आले आहेत. आम्हाला मुंबईमध्ये खेळण्याचा अतिरिक्त फायदा मिळेल, असं वाटत नाही. टीममधील 70 ते 80 टक्के खेळाडू यापूर्वी मुंबईत खेळले नाहीत. त्यामुळे अतिरिक्त फायदा मिळण्याचा विषय नाही. या टीममधील फक्त मी, सूर्या (सूर्यकुमार यादव), कायरन पोलार्ड, इशान किशन आणि जसप्रीत बुमराह यांनी मुंबईत बऱ्याच मॅच खेळल्या आहेत. अन्य खेळाडूंना इथं खेळण्याचा अनुभव नाही. आम्ही सर्व 2 वर्षांनंतर मुंबईत खेळत आहोत. मागच्या सिझनमध्ये अन्य टीम मुंबईत आल्या होत्या. पण, आम्हाला खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे इथं खेळण्याचा अतिरिक्त फायदा होणार नाही,’ असे रोहितने स्पष्ट केले. IPL 2022 : LSG मध्ये नव्या खेळाडूची एन्ट्री, पर्पल कॅप विजेत्या बॉलरचा टीममध्ये समावेश आयपीएलच्या मागच्या मोसमातल्या खराब कामगिरीनंतर टीमने यंदा बरेच बदल केले आहेत. हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या हे दोन बंधू आता वेगळ्या टीमकडून खेळताना दिसतील. तर क्विंटन डिकॉक आणि ट्रेन्ट बोल्ट हेदेखील आता मुंबईच्या टीमचा भाग नाहीत. आयपीएल लिलावामध्ये मुंबईने नव्याने टीमची बांधणी केली.  मुंबई इंडियन्सची टीम : रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, रमणदीप सिंग, राहुल बुद्धी, अनमोलप्रीत सिंग, डेवाल्ड ब्रेव्हीस, आर्यन जुयाल, इशान किशन, कायरन पोलार्ड, ऋतिक शौकीन, अर्जुन तेंडुलकर, संजय यादव, डॅनियल सॅम्स, टीम डेव्हिड, फॅबियन एलन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद अर्षद खान, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, जोफ्रा आर्चर, टायमल मिल्स, रिले मेरेडिथ, मुरुगन अश्विन, बसील थंपी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात