मुंबई, 24 मार्च : आयपीएल स्पर्धा आता 2 दिवसांवर आली आहे. सर्व टीमची तयारी अंतिम टप्प्यात आली असून स्पर्धेपूर्वी माघार घेणाऱ्या खेळाडूंच्या जागी नव्या खेळाडूंची निवड केली जात आहे. आयपीएल स्पर्धेत पहिल्यांदाच खेळणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) टीममध्ये दमदार खेळाडूची एन्ट्री झाली आहे. लखनऊचा फास्ट बॉलर मार्क वूडनं (Mark Wood) दुखापतीमुळे आयपीएलमधून माघार घेतली आहे. त्यामुळे लखनऊनं वूडच्या जागी ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर अँड्रयू टायची (Andrew Tye) निवड केली आहे. लखनऊनं त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून टायची निवड केल्याची अधिकृत घोषणा केली आहे. टायचं आयपीएल ऑक्शनमधील बेस प्राईज 1 कोटी होते, पण त्याला कोणत्याही आयपीएल टीमनं खरेदी केले नव्हते. तर मार्क वूडची लखनऊनं तब्बल 7 कोटी रूपये मोजून खरेदी केली होती. टायनं 2018 साली आयपीएल स्पर्धेत पर्पल कॅप जिंकली आहे. त्यावेळी त्यानं किंग्ज इलेव्हन पंजाबकडून (सध्याचे नाव पंजाब किंग्ज) 14 मॅचमध्ये 24 विकेट्स घेतल्या होत्या. त्याने आजवरच्या आयपीएल कराकिर्दीमध्ये 27 मॅचमध्ये 40 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामध्ये एका मॅचमध्ये 4 विकेट्स एकदा तसंच 5 विकेट्स एकदा घेण्याचा समावेश आहे. आयपीएलमध्ये हॅट्ट्रिक घेण्याचा रेकॉर्डही त्याच्या नावावर आहे. टायनं ऑस्ट्रेलियाकडून खेळताना 32 टी20 इंटरनॅशनलमध्ये 47 विकेट्स घेतल्या आहेत.
Ab apni baari hai, kyuki humari team mein Andrew Tye bhaari hai! #AbApniBaariHai 💪@aj191
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) March 23, 2022
📸: Cricket Australia#LucknowSuperGiants #TataIPL #IPL2022 #UttarPradesh #Lucknow #LSG2022 #CricketUpdates #CricketNews pic.twitter.com/KNiL0oyO3m
डेथ ओव्हर्स स्पेशालिस्ट 35 वर्षांच्या टायनं बिग बॅश लीगमध्ये पर्थ स्क्रॉचर्सकडून डेथ ओव्हर्समध्ये दमदार बॉलिंग केली. यावर्षी पर्थनं जिंकलेल्या विजेतेपदातमध्ये त्याच्या बॉलिंगचे योगदान होते. टायनं सिडनी सिक्सर्स विरूद्ध झालेल्या फायनलमध्ये 3 ओव्हर्समध्ये 15 रन देत 3 विकेट्स घेतल्या होत्या. तो लखनऊ सुपर जायंट्सकडील आयपीएलमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक विकेट्स घेणारा बॉलर आहे. लखनऊकडं आवेश खान, दुष्मंथा चमिरा आणि अंकित राजपूत हे स्पेशालिस्ट फास्ट बॉलर आहेत. तसंच जेसन होल्डर, मार्कस स्टॉईनिस आणि काईल मेयर्स हे चांगले ऑल राऊंडर्सही आहेत. IPL मध्ये संधी न दिल्याचा निघाला आफ्रिकेवर राग, बांगलादेशचा आफ्रिकेत ऐतिहासिक विजय लखनऊ पहिली मॅच 28 मार्च रोजी गुजरात टायटन्स विरूद्ध मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळणार आहे. गुजरात टायटन्सची टीमही लखनऊ प्रमाणेच या आयपीएलमध्ये पदार्पण करणार आहे.