मुंबई, 13 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये कुलदीप यादव (Kuldeep Yadav) दमदार कामगिरी करत आहे. कुलदीपनं आत्तापर्यंतच्या 4 मॅचमध्ये 10 विकेट्स घेतल्या असून तो पर्पल कॅपचा प्रबळ दावेदार आहे.कुलदीपसाठी मागील काही आयपीएल सिझन निराशाजनक ठरले होते. त्याला केकेआरकडून फार संधीही मिळाली नाही. यंदा दिल्ली कॅपिटल्समध्ये (Delhi Capitals) खरेदी केल्यानंतर कुलदीपचा खेळ कमालीचा सुधारला आहे. दिल्लीचा कोच रिकी पॉन्टिंगनं (Ricky Ponting) कुलदीपला खरेदी करण्याचं कारण सांगितलं आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या पॉडकास्टमध्ये पॉन्टिंग म्हणाला की, ‘कुलदीपला केकेआरकडून मागील दोन वर्षांमध्ये खूप कमी संधी मिळाली. त्याला आत्मविश्वास दिला तर फरक पडेल हे आम्हाला माहिती होते. आम्ही छोटे अडथळे दूर करत आहोत, त्यामुळे खेळाडू मोकळेपणे खेळतील. कुलदीपच्या बाबतीमध्येही तसंच आहे. त्याच्यासारख्या बॉलरला केकेआरमध्ये संधी न मिळणं मी समजू शकतो. केकेआरकडं चांगले स्पिनर्स आहे. कुलदीप दिल्ली कॅपिटल्समध्ये आला तर त्याचा आत्मविश्वास जागृत केल्यास त्याची बॉलिंग सुधारेल असा विचार मी केला, तो सध्या दमदार बॉलिंग करत आहे याचा मला आनंद आहे, असं पॉन्टिंगनं स्पष्ट केलं. कुलदीपसारख्या बॉलरला खेळवताना संयम आवश्यक आहे, असं त्यानं यावेळी सांगितलं. ‘टी20 क्रिकेटमध्ये स्पिनर्सच्या कामगिरीत चढ-उतार होत असतो. त्यामुळे फरक पडत नाही. आमची टीममधील खेळाडूंना एकसारखीच वागणूक असेल.’ असं पॉन्टिंग यावेळी म्हणाला. IPL 2022 : 2 कॅच सोडणाऱ्या सहकाऱ्याला दिला दिलासा, धोनीनं पुन्हा जिंकलं सर्वांचं मन! VIDEO दर 9 बॉलनंतर 1 विकेट कुलदीपनं या आयपीएल सिझनमधील 4 मॅचमध्ये 15.4 ओव्हर्स बॉलिंग करत 10 विकेट्स घेतल्या आहेत. कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध त्यानं 35 रन देत 4 विकेट्स घेतल्या. ही त्याची आयपीएल स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी आहे. कुलदीप दिल्लीसाठी मिडल ओव्हर्समध्ये परिणामकारक ठरतोय. त्यानं या ओव्हर्समध्ये रन वाचवण्याबरोबरच विकेट्सही घेतल्या आहेत. कुलदीपनं या सिझनमध्ये दर 9 बॉलनंतर एक विकेट घेतली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.