मुंबई, 13 मार्च : चेन्नई सुपर किंग्सनं (Chennai Super Kings) अखेर आयपीएल 2022 मधील पहिला विजय मिळवला आहे. सीएसकेनं मंगळवारी झालेल्या सामन्यात आरसीबीचा (RCB vs CSK) 23 रननं पराभव केला. शिवम दुबे (Shivam Dube) आणि रॉबिन उथप्पा (Robin Uthhapa) यांच्या वादळी खेळीमुळे सीएसकेला हा विजय मिळाला. महीश तीक्षाणानं 4 तर कॅप्टन रविंद्र जडेजानं 3 विकेट्स घेत या विजयामध्ये योगदान दिले. त्याचबरोबर नवोदीत मुकेश चौधरीही (Mukesh Choudhary) देखील या मॅचमध्ये चांगलाच चर्चेत होता. मुकेशनं सर्वप्रथम आरसीबीचा सर्वात धोकादायक खेळाडू विराट कोहलीला फक्त 1 रनवर आऊट केलं. या यशाचा आनंद त्याला फार साजरा करता आला नाही. त्यानं या मॅचमध्ये दोन कॅच सोडल्या. मुकेशनं पहिल्यांदा दिनेश कार्तिकचा कॅच सोडला. त्यानंतर शाहबाज अहमदचाही कॅच त्याला घेता आला नाही. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. आयपीएल स्पर्धेत पहिल्यांदाच खेळत असलेला मुकेश दोन कॅच सोडल्यानं चांगलाच निराश झाला होता. सीएसकेचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) या अवघड परिस्थितीमध्ये मुकेशला धीर दिला. महीश तीक्षणानं शाहबाजला आऊट केल्यानंतर धोनी सर्वात प्रथम मुकेशच्या जवळ गेला आणि त्यानं त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याचा उत्साह वाढवला. धोनीच्या या कृतीनं पुन्हा एकदा फॅन्सचं मन जिंकलं आहे.
#CSKvsRCB pic.twitter.com/ezEsWeZbhc
— Kamaljeet Singh (@jitkamalrajput) April 12, 2022
चेन्नईने दिलेल्या 217 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 193 रन करता आले. मॅक्सवेलने 11 बॉलमध्ये 26, शाहबाज अहमदने 27 बॉलमध्ये 41, सुयश प्रभुदेसाईने 18 बॉलमध्ये 34 आणि दिनेश कार्तिकने 14 बॉलमध्ये 34 रनची खेळी केली. या सर्वांचे प्रयत्न अखेर अपुरे पडले. रोहित शर्माची डोकेदुखी वाढली, टीम इंडियाचा सर्वात मोठा मॅच विनर ठरतोय फेल सीएसकेने मोसमातला पहिला विजय मिळवल्यामुळे पॉईंट्स टेबलमध्ये ते नवव्या क्रमांकावर पोहोचले आहेत, तर मुंबई इंडियन्स आता शेवटच्या म्हणजेच 10व्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे आरसीबी पाचव्या क्रमांकावर आहे.