Home /News /sport /

IPL 2022 : विराट कोहलीमध्ये दिसला अंडरटेकर, शुभमन गिलकडं पाहात केला खतरनाक इशारा! VIDEO

IPL 2022 : विराट कोहलीमध्ये दिसला अंडरटेकर, शुभमन गिलकडं पाहात केला खतरनाक इशारा! VIDEO

विराट कोहली (Virat Kohli) आरसीबीच्या विजयाचा हिरो ठरला. त्यानं या मॅचमध्ये दमदार अर्धशतक झळकावत आरसीबीला विजय मिळवून दिला. विराटनं यावेळी खास स्टाईलनं फटकेबाजी केली. त्याचबरोबर फिल्डिंगमध्येही त्याचं आक्रमक रूप दिसलं.

    मुंबई, 21 मे : आयपीएल 2022 मधील 67 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरूद्ध गुजरात टायटन्स (RCB vs GT) यांच्यात झाला. या सामन्यात आरसीबीनं गुजरातचा 8 विकेट्सनं एकतर्फी पराभव करत स्पर्धेतील आव्हान कायम ठेवलं आहे. विराट कोहली (Virat Kohli) आरसीबीच्या विजयाचा हिरो ठरला. त्यानं या मॅचमध्ये दमदार अर्धशतक झळकावत आरसीबीला विजय मिळवून दिला. विराटनं यावेळी त्याच्या खास स्टाईलनं फटकेबाजी केली. त्याचबरोबर फिल्डिंगमध्येही त्याचं आक्रमक रूप दिसलं. विराट WWE चा मोठा फॅन्स आहे. गुजरात टायटन्स विरूद्धच्या मॅचमध्ये त्यानं WWE स्टार अंडरटेकरच्या थ्रोट स्लॅशची नक्कल केली. अंडरटेकरच्या गळा कापण्याच्या इशाऱ्याला 'थ्रोट स्लॅश' असे म्हंटले जाते. त्यानं गुजरातचा बॅटर शुभमन गिलकडं पाहात हा इशारा केला. विराटनं यापूर्वी लखनऊ सुपर जायंट्स विरूद्धच्या मॅचमध्ये या प्रकारचा इशारा केला होता. https://twitter.com/Biscuit8Chai/status/1527563466491711490?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1527563466491711490%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fcircleofcricket.com%2Fcategory%2FIPL%2F76292%2Fipl-2022-watch-virat-kohli-recreates-undertakers-iconic-throat-slash-at-shubman-gill-video-goes-viral या आयपीएल सिझनमध्ये (IPL 2022) फॉर्मसाठी झगडणाऱ्या विराटनं गुजरात विरूद्ध आत्मविश्वासानं खेळ केला. त्यानं 54 बॉलमध्ये 8 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीनं 73 रन केले. गुजरात टायटन्सनं पहिल्यांदा बॅटींग करत आरसीबीसमोर 169 रनचं टार्गेट ठेवलं होतं. विराटच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर आरसीबीनं हे टार्गेट 8 विकेट्स राखून पूर्ण केलं. 48 वर्षांनी बदलणार गांगुलीचा पत्ता, BCCI अध्यक्षांच्या नव्या घराची किंमत वाचून बसेल धक्का गुजरातविरुद्धच्या या विजयासोबतच आरसीबीचं प्ले-ऑफचं आव्हान अजूनही कायम आहे, पण त्यांना आता मुंबई इंडियन्सवर अवलंबून राहावं लागणार आहे. शनिवारी मुंबईने दिल्लीचा पराभव केला, तर आरसीबी प्ले-ऑफमध्ये प्रवेश करेल, पण जर या सामन्यात दिल्लीचा विजय झाला तर मात्र आरसीबीचं प्ले-ऑफ खेळण्याचं स्वप्न धुळीला मिळेल.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Gujarat Titans, Ipl 2022, RCB, Virat kohli

    पुढील बातम्या