मुंबई, 21 मे : बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी कोलकातामध्ये नवं घरं घेतलं आहे. गांगुली यांचं हे दोन मजली घर कोलकातामधील लोअर रॉडन स्ट्रीचवर आहे. गांगुली त्यांच्या पिढीजात घरात गेल्या 48 वर्षांपासून राहात होते. आता नव्या घरासह त्यांचा कोलकातामधील पत्ता बदलला आहे.
गांगुली यांनी हे घर तब्बल 40 कोटींमध्ये घेतले आहे. 'द टेलिग्राफनं' दिलेल्या वृत्तानुसार, गांगुली यांनी सांगितलं की, 'मी नवं घर विकत घेतल्यानंतर खूप आनंदी आहे. मला त्या घरामध्ये छान राहता येईल. त्याचबरोबर गेल्या 48 वर्षांपासून मी ज्या घरात राहतोय ते घरं सोडणं माझ्यासाठी अवघड आहे.' या विषयावर सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गांगुली यांनी आई निरूपा गांगुली, पत्नी डोना आणि मुलगी सना यांच्यासोबत ही नवी संपत्ती खरेदी केली आहे. गांगुली लवकरच नव्या घरात शिफ्ट होणार आहे.
सौरव गांगुलीच्या क्रिकेट कारकिर्दीप्रमाणेच त्याचं जुनं घर देखील चांगलंच चर्चेत राहिलं. गांगुलीचा जन्म याच घरात झाला. तसंच याच घरात तो मोठा झाला. सचिन तेंडुलकरसह टीम इंडियातील अनेक खेळाडू गांगुलीच्या जुन्या घरी आले आहेत. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही या घरी जाऊन गांगुलीसोबत जेवण केले होते.
IPL 2022 : अश्विनच्या आक्रमणापुढे चेन्नई फेल, विजयानंतर स्वत:ची केली वॉर्नरशी तुलना
टीम इंडियाच्या यशस्वी कॅप्टनमध्ये गांगुलीचा समावेश होता. भारतीय उपखंडाच्या बाहेर सातत्यानं टेस्ट जिंकण्यास त्याच्याच कॅप्टनसीमध्ये सुरूवात झाली. त्याचबरोबर 2003 मधील वर्ल्ड कपमध्ये गांगुलीच्या कॅप्टनसीमध्ये टीम इंडियानं फायनलपर्यंत धडक मारली होती. गांगुलीनं भारतासाठी 113 टेस्टमध्ये 7212 तर 311 वन-डेमध्ये 11363 रन केले आहेत. निवृत्तीनंतर गांगुली काही वर्ष बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष होता. तो सध्या बीसीसीआय अध्यक्ष आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.