मुंबई, 20 मे : रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं (Royal Challengers Bangalore) गुरूवारी झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सवर (Gujarat Titans) 8 विकेट्सनं विजय मिळवला. या विजयासह आरसीबीचे आता 16 पॉईंट्स झाले असून त्यांचे 'प्ले ऑफ' मधील आव्हान अद्याप कायम आहे. आरसीबीला या विजयात नशिबाचीही साथ मिळाली. त्यांचा ऑल राऊंडर ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) यावेळी सुदैवी ठरला.
गुजरात टायटन्सनं दिलेल्या 169 रनचा पाठलाग करताना आरसीबीनं भक्कम सुरूवात केली होती. आरसीबीची पहिली विकेट 15 व्या ओव्हरमध्ये पडली. कॅप्टन फाफ डुप्लेसीला 44 रनवर राशिद खाननं आऊट केलं. त्यानंतर राशिदचा पुढचाच बॉल मॅक्सवेलच्या लेग स्टम्पला लागून बाऊंड्रीच्या बाहेर गेला. यावेळी राशिदसह गुजरातच्या सर्व खेळाडूंनी विजयाचा आनंद साजरा केला. पण, त्या बॉलनं बेल्स पडल्या नव्हत्या. त्यामुळे मॅक्सवेल नॉट आऊट ठरला. नियमानुसार बेल्स पडत नाहीत तोपर्यंत बॅटर आऊट नसतो. या आयपीएलमध्ये हा प्रकार दुसऱ्यांदा घडला आहे.
आरसीबीला या जीवदानाचा चांगलाच फायदा झाला. मॅक्सवेलनं पुढच्या 17 बॉलमध्ये 40 रन करत टीमला विजय मिळवून दिला. या खेळीत त्यानं 5 फोर आणि 2 सिक्स लगावले. त्याचा स्ट्राईक रेट 222 होता. त्यानं शुभमन गिलचा स्लिपमध्ये एक जबरदस्त कॅचही पडकला. त्याचबरोबर मॅथ्यू वेडची विकेटही घेतली.
IPL 2022 : अंपायरच्या एका चुकीमुळे KKR प्ले-ऑफमधून बाहेर! रिंकूच्या विकेटमुळे नवा वाद
गुजरातने दिलेलं 169 रनचं आव्हान आरसीबीने 18.4 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून पार केलं. या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहली आणि फाफ डुप्लेसिस यांच्यात 115 रनची पार्टनरशीप झाली.आरसीबीकडून विराट कोहलीने 54 बॉलमध्ये 73 रनची खेळी केली, तर डुप्लेसिस 38 बॉलमध्ये 44 रन करून आऊट झाला. ग्लेन मॅक्सवेलने 18 बॉलमध्ये नाबाद 40 रन केले. गुजरातकडून राशिद खानने दोन्ही विकेट घेतल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.