• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL Mega Auction: सुरेश रैना कि ऋतुराज गायकवाड? धोनीसमोर मोठा प्रश्न

IPL Mega Auction: सुरेश रैना कि ऋतुराज गायकवाड? धोनीसमोर मोठा प्रश्न

आयपीएल स्पर्धा तीन वेळा जिंकणारी चेन्नई सुपर किंग्स (CSK) टीम कोणत्या चार खेळाडूंना रिटेन करणार याची त्यांच्या फॅन्सना उत्सुकता आहे.

 • Share this:
  मुंबई, 5 जुलै: आयपीएल स्पर्धेच्या पुढील सिझनपूर्वी (IPL 2022) मेगा ऑक्शन होणार आहे. या ऑक्शनसाठी बीसीसीआयनं नवे नियम तयार केल्याची माहिती आहे. या नियमानुसार प्रत्येक टीमना  जास्तीत जास्त  4 खेळाडू रिटेन करण्याची परवानगी मिळेल. यामध्ये त्यांना 3 भारतीय आणि 1 विदेशी किंवा 2 भारतीय आणि 2 विदेशी खेळाडूंना रिटेन करता येणार आहे. CSK कुणाला करणार रिटेन? आयपीएल स्पर्धा तीन वेळा जिंकणारी चेन्नई सुपर किंग्स (CSK) टीम कोणत्या चार खेळाडूंना रिटेन करणार याची त्यांच्या फॅन्सना उत्सुकता आहे. चेन्नईचा पहिल्या सिझनपासूनचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आणि प्रमुख ऑल राऊंडर रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) या दोघांना टीम मेगा ऑक्शनपूर्वी रिटेन करेल अशी दाट शक्यता आहे. सीएसकेची टीम तिसऱ्या जागेसाठी भारतीय खेळाडूची निवड करण्याची शक्यता आहे. त्या परिस्थितीमध्ये चेन्नईकडून आयपीएलमध्ये सर्वात जास्त रन करणारा सुरेश रैना (Suresh Raina) आणि तरुण खेळाडू ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) यांच्यात मोठी चुरस आहे. सुरेश रैना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी त्याची आयपीएल स्पर्धेत खास ओळख आहे. धोनीचा विश्वासू सहकारी असलेला रैना पहिल्या सिझनपासून चेन्नईचा सदस्य आहे. चेन्नईच्या आयपीएल विजेतेपदामध्ये त्याचे मोलाचे योगदान आहे. तसेच रैना चेन्नईच्या फॅन्समध्ये मोठा लोकप्रिय आहे. दुसरिकडे मराठमोळ्या ऋतुराजनं मागील वर्षी यूएईमध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेतून (IPL 2020) चेन्नईच्या टीममध्ये पदार्पण केले आहे. ऋतुराजनं कमी वेळात सर्वांना प्रभावित केले आहे. चेन्नईला चांगली सुरुवात करुन देण्याची जबाबदारी ओपनिंग बॅट्समन असलेल्या ऋतुराजवर आहे. ही आयपीएल स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी (IPL 2021) ऋतुराज चांगल्याच फॉर्मात होता. त्याने 7 मॅचमध्ये 196 रन काढल आहेत. यामध्ये दोन अर्धशतकाचा समावेश आहे. अनुभवी रैना आणि भविष्य ऋतुराज यापैकी कुणाची निवड करायची हा मोठा प्रश्न धोनीसमोर असेल. IPL Mega Auction: मुंबई इंडियन्सचं टेन्शन वाढलं, 'या' दिग्गजांना द्यावा लागणार निरोप! चेन्नई सुपर किंग्समधील विदेशी खेळाडूंच्या जागेसाठी ड्वेन ब्राव्हो, फाफ ड्यू प्लेसिस,  सॅम करन, आणि मोईन अली यांच्यात स्पर्धा आहे.
  Published by:News18 Desk
  First published: