Home /News /sport /

IPL Mega Auction: मुंबई इंडियन्सचं टेन्शन वाढलं, 'या' दिग्गजांना द्यावा लागणार निरोप!

IPL Mega Auction: मुंबई इंडियन्सचं टेन्शन वाढलं, 'या' दिग्गजांना द्यावा लागणार निरोप!

पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएल सिझनसाठी (IPL 2022) बीसीसीआयने सविस्तर योजना (blueprint) तयार केली आहे. बीसीसीआयच्या नियमामुळे मुंबई इंडियन्सचं (Mumbai Indians) टेन्शन वाढलं आहे.

    मुंबई, 5 जुलै: पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएल सिझनसाठी  (IPL 2022) बीसीसीआयने सविस्तर योजना (blueprint) तयार केली आहे. पुढील आयपीएल सिझनमध्ये दोन टीम वाढणार  आहेत. त्यामुळे एकूण टीमची संख्या  10 आहे. बीसीसीआय यंदा खेळाडू रिटेन करण्याच्या नियमातही बदल करणार आहे. सर्व फ्रँचायझींना जास्तीत जास्त  4 खेळाडू रिटेन करण्याची परवानगी मिळेल. यामध्ये त्यांना 3 भारतीय आणि 1 विदेशी किंवा 2 भारतीय आणि 2 विदेशी खेळाडूंना रिटेन करता येणार आहे. कुणाला करणार रिटेन? बीसीसीआयच्या  नियमामुळे पाच वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सचं टेन्शन वाढलं आहे. मुंबई इंडियन्सच्या सध्याच्या टीममध्ये सर्व खेळाडू हे मॅच विनर आहेत. त्यामुळे यापैकी कोणत्या चार खेळाडूंना कायम ठेवायचं हा प्रश्न मॅनेजमेंटसमोर असेल. मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) या दोन भारतीय खेळाडूंना  कायम ठेवणार हे नक्की आहे. रोहितच्या कॅप्टनसीमध्येच मुंबईनं सर्व आयपीएल स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावले आहे. टीमच्या आजवरच्या वाटचालीत रोहितची बॅटींग आणि कॅप्टनसीचा मोठा वाटा आहे. तर जसप्रीत बुमराह हा मुंबईचाच नाही तर जगातील अव्वल बॉलर आहे. टीमचे आधारस्तंभ असलेल्या या दोन खेळाडूंना मुंबई इंडियन्स कायम ठेवणार याबाबत सर्वांचेच एकमत आहे. मुंबई इंडियन्सला किमान एक विदेशी खेळाडू रिटेन करण्याची संधी मिळेल. तो विदेशी खेळाडू अर्थातच कायरन पोलार्ड (Kieron Pollard) असेल. पोलार्ड आजवर फक्त मुंबईकडूनच आयपीएल खेळला आहे. अनेक निर्णायक लढतीमध्ये त्याने टीमला विजय  मिळवून दिला आहे. वेस्ट इंडिजच्या लिमिटेड ओव्हर टीमचा कॅप्टन असलेल्या पोलार्डकडं टी20 क्रिकेटचा मोठा अनुभव आहे. तसंच तो रोहितच्या अनुपस्थितीमध्ये मुंबईच्या टीमचं नेतृत्त्वही करतो. पोलार्ड आणि मुंबई इंडियन्सचं नात यापुढेही कायम असेल. मोठी बातमी! 2 नव्या IPL टीमबाबत BCCI ची blueprint तयार, वाचा कधी होणार ऑक्शन कुणाला देणार निरोप? मुंबई इंडियन्सनं तीन भारतीय खेळाडू रिटेन करण्याचा पर्याय निवडला तर तिसऱ्या जागेसाठी सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांच्यात चुरस असेल. त्या परिस्थितीमध्ये सूर्या आणि यादवपैकी एक तसेच इशान किशन, कृणाल पांड्या, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट आणि क्विंटन डी कॉक यांना निरोप द्यावा लागेल. मुंबईनं दोन विदेशी खेळाडू रिटेन करण्याचे ठरवले तर दुसऱ्या जागेसाठी ट्रेंट बोल्ट आणि क्विंटन डी कॉक यांच्यात चुरस असेल. त्या परिस्थितीमध्ये बोल्ट आणि डी कॉकपैकी एक तसेच हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, सूर्यकुमार यादव, इशान किशन राहुल चहर यांना मुंबईला निरोप द्यावा लागेल. निरोप दिलेल्या खेळाडूंना मेगा ऑक्शनमध्ये खरेदी करण्याचा पर्याय मुंबईच्या मॅनेजमेंटसमोर आहे. पण, या सर्वांसाठीच मोठी बोली लागणार असल्यानं त्यांना खरेदी करण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागू शकते. यापैकी काही खेळाडू पुढील वर्षी दुसऱ्या आयपीएल टीमकडून खेळणार हे नक्की आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, Ipl, Mumbai Indians

    पुढील बातम्या