राजस्थान रॉयल्सच्या फिल्डिंगच्या दरम्यान दुसरा प्रकार घडला. त्यावेळी परागनं मिड ऑफवरून पळत येत डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल अडवला. त्यावेळी देवदत्त पडिक्कल बॉलपर्यंत पोहचू शकला नव्हता. त्यावेळी देखील पराग चांगलाच संतापला होता. त्याच्या या वर्तनामुळे तो सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होत आहे.Riyan Parag gets runout pic.twitter.com/k8rzf0SjZI
— StumpMic Cricket (@stumpmic_) May 24, 2022
आयपीएल 2022 मध्ये गुजरात टायटन्सनं राजस्थान रॉयल्सचा (GT vs RR) 7 विकेट्सनं पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. राजस्थान रॉयल्सने दिलेलं 189 रनचं आव्हान पार करायला आलेल्या गुजरातला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 16 रनची गरज होती. डेव्हिड मिलरने प्रसिद्ध कृष्णाच्या 20व्या ओव्हरच्या पहिल्या तिन्ही बॉलना तीन सिक्स मारून गुजरातला थरारक विजय मिळवून दिला.डेव्हिड मिलरने 38 बॉलमध्ये 178.95 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 68 रन केले, यामध्ये 5 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. याशिवाय गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) 27 बॉलमध्ये नाबाद 40 रनची खेळी केली. Women's T20 Challenge : हरमनप्रीतनं हवेत उडी मारत पकडला जबरदस्त कॅच, VIDEO पाहून व्हाल थक्क! राजस्थान रॉयल्सचा या सामन्यात पराभव झाला असला तरीही त्यांना फायनलला पोहोचण्याची आणखी एक संधी आहे. बुधवारी आरसीबी आणि लखनऊ यांच्यात एलिमिनेटरचा सामना होणार आहे. या सामन्यात विजयी होणारी टीम राजस्थानविरुद्ध क्वालिफायरचा दुसरा सामना खेळेल.या सामन्यात विजयी झालेली टीम फायनलमध्ये गुजरात विरूद्ध खेळणार आहे.@ParagRiyan check ur stats in batting ur calling urself finisher /alrounder all u do is catch practice pic.twitter.com/TInt2B0Gud
— retired Indian fan (@Sivasakthisrini) May 24, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gujarat Titans, Ipl 2022, Rajasthan Royals