जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Women's T20 Challenge : हरमनप्रीतनं हवेत उडी मारत पकडला जबरदस्त कॅच, VIDEO पाहून व्हाल थक्क!

Women's T20 Challenge : हरमनप्रीतनं हवेत उडी मारत पकडला जबरदस्त कॅच, VIDEO पाहून व्हाल थक्क!

Women's T20 Challenge : हरमनप्रीतनं हवेत उडी मारत पकडला जबरदस्त कॅच, VIDEO पाहून व्हाल थक्क!

हरमनप्रीत कौरनं (Harmanpreet Kaur) एक जबरदस्त कॅच घेत शफालीच्या खेळीचा अंत केला. हरमनचा हा कॅच सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 25 मे : आयपीएल स्पर्धेचा पंधरावा सिझन (IPL 2022) आता अंतिम टप्प्यात आलाय. आयपीएल स्पर्धेचा हा शेवटचा आठवडा असून यामध्ये ‘प्ले ऑफ’ ला सुरूवात झाली आहे. आयपीएल ‘प्ले ऑफ’ च्या दरम्यानच महिला क्रिकेटपटूंची टी20 चॅलेंज (Women’s T20 Challenge) स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेच्या मंगळवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात शफाली वर्माच्या (Shafali Verma) 51 आणि लॉरा वुडलाईटच्या (नाबाद 51) रनच्या खेळीवर व्हेलॉसिटीनं सुपपनोवाजचा 7 विकेट्सनं पराभव केला आहे. सुपरनोवाजचा या सामन्यात पराभव झाला असला तरी त्यांची कॅप्टन हरमनप्रीत कौरनं (Harmanpreet Kaur) एक जबरदस्त कॅच घेत शफालीच्या खेळीचा अंत केला. हरमनचा हा कॅच सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हेलोसिटीच्या इनिंगमधील 10 व्या ओव्हरमध्ये डिंएड्रा डॉटीननं ऑफ स्टम्पच्या बाहेर टाकलेल्या शॉर्ट बॉलवर शफालीनं जोरदार फटका लगावला. त्यावेळी हरमन शॉर्ट थर्ड मॅनला फिल्डिंग करत होती. तिनं अजिबात वेळ वाया न घालवता डावीकडं हवेत उडी घेतली आणि शफालीचा जबरदस्त कॅच घेतला.

जाहिरात

शफालीनं आऊट होण्यापूर्वी 33 बॉलमध्ये 51 रन केले. यावेळी तिनं फक्त 30 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं. हे या स्पर्धेतील सर्वात वेगवान अर्धशतक आहे. यापूर्वी हरमनच्या 51 बॉल 71 रनच्या जोरावर सुपरनोवाजनं पहिल्यांदा बॅटींग करत 5 आऊट 150 रन केले. व्हेलोसिटीनं 151 रनचं टार्गेट 10 बॉल आणि 7 विकेट्स राखत पूर्ण केलं. दीप्ती शर्मा आणि वुडलाईट जोडीनं नाबाद 71 रनची भागिदारी करत टीमच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. IPL 2022 : 2 वर्ष संधी न देणाऱ्या टीमला शिकवला धडा! ‘किलर’स्टाईलनं केली फायनलमध्ये एन्ट्री या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात सुपरनोवाजनं स्मृती मंधानाच्या (Smriti Mandhana) ट्रेलब्लेजर्सचा (Trailblazers) 49 रननं पराभव केला होता. त्या सामन्यात पूजा वस्त्राकारनं 4 विकेट्स घेत टीमला विजय मिळवून दिला होता. स्पर्धेतील शेवटचा साखळी सामना ट्रेलब्लेजर्स विरूद्ध व्हेलोसिटी यांच्यात गुरूवारी होईल. तर शनिवारी 28 मे रोजी फायनल खेळली जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात