Home /News /sport /

IPL 2022, RR vs GT : 2 टीमच नाही तर दोन खेळाडूंमध्येही होणार श्रेष्ठत्वाची लढाई

IPL 2022, RR vs GT : 2 टीमच नाही तर दोन खेळाडूंमध्येही होणार श्रेष्ठत्वाची लढाई

आयपीएल 2022 मधील क्वालिफायर 1 मध्ये या दोन टीममध्येच नाही तर दोन खेळाडूंमध्येही जोरदार लढत होणार आहे. त्या दोघांनीही आपआपल्या टीमकडून सर्वात जास्त विकेट्स घेतल्या आहेत. विशेष म्हणजे हे दोघंही लेग स्पिनर आहेत.

    मुंबई, 24 मे : आयपीएल 2022 मधील पहिला क्वालिफायर (IPL 2022, Qualifier 1) सामना गुजरात टायटन्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स (GT vs RR) यांच्यात होणार आहे. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) गुजरातनं या स्पर्धेत दमदार पदार्पण केलं आहे. त्यांनी 14 पैकी 10 सामने जिंकत 'प्ले ऑफ' गाठली आहे. तर मागील सिझनमध्ये निराशाजनक कामगिरी केलेल्या राजस्थान रॉयल्सनं यंदा दुसऱ्या क्रमांकासह 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश केला आहे. या दोन्ही टीमनं बॅटींग आणि बॉलिंगमध्ये आत्तापर्यत दमदार कामगिरी केली आहे. क्वालिफायर 1 मध्ये या दोन टीममध्येच नाही तर दोन खेळाडूंमध्येही जोरदार लढत होणार आहे. त्या दोघांनीही आपआपल्या टीमकडून सर्वात जास्त विकेट्स घेतल्या आहेत. विशेष म्हणजे हे दोघंही लेग स्पिनर आहेत. गुजरात टायटन्सकडून राशिद खाननं (Rashid Khan) सर्वाधिक 18 विकेट्स घेतल्या आहेत. राजस्थानकडून हे काम युजवेंद्र चहलनं (Yuzvendra Chahal) केलं आहे. चहलनं आत्तापर्यंत 14 सामन्यात 26 विकेट्स घेतल्या असून तो पर्पल कॅपच्या रेसमध्ये सर्वात आघाडीवर आहे. या सिझनमधील राजस्थान रॉयल्सच्या दमदार कामगिरीत चहलचा मोठा वाटा आहे. लीग स्टेजमध्ये राजस्थानच्या बॉलर्सनं एकूण 84 विकेट्स घेतल्या आहेत. यापैकी जवळपास एक तृतीयांश विकेट्स चहलनं घेतल्या आहेत. त्यानं या सिझनमध्ये एक वेळा 4 आणि 1 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत. तसंच हॅट्ट्रिकही केली आहे.चहलनं दर 13 बॉलमध्ये एक विकेट घेतली असून तो राजस्थानचा मॅच विनर आहे. Ranji Trophy : 'नॉक आऊट' राऊंडपूर्वी मुंबईला धक्का, IPL गाजवणारा खेळाडू स्पर्धेतून बाहेर युजवेंद्र चहलनं राजस्थान रॉयल्ससाठी केलेलं काम राशिद गुजरात टायटन्ससाठी करतोय. राशिदनं 14 सामन्यात 21.55 च्या सरासरीनं 18 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानं एक वेळा 4 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. बॉलिंग प्रमाणेच बॅटींगमध्येही राशिदनं कमाल केली आहे. राशिदनं आत्तापर्यंत फक्त 91 रन केले असले तरी त्याचा स्ट्राईक रेट 206 आहे. राशिदनं त्याच्या आक्रमक बॅटींगच्या जोरावरही टीमला विजय मिळवून दिला आहे. त्यामुळे क्वालिफायर 1 मध्ये राशिद आणि चहल यांच्या लढाईत जो खेळाडू बाजी मारेल त्या टीमचा फायनलमधील प्रवेश नक्की आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Gujarat Titans, Ipl 2022, Rajasthan Royals, Yuzvendra Chahal

    पुढील बातम्या