मुंबई, 24 मे : आयपीएल स्पर्धेनंतर (IPL 2022) लगेच रणजी ट्रॉफी स्पर्धेचे नॉक आऊट (Ranji Trophy Knock Out) राऊंड सुरू होत आहे. या स्पर्धेची क्वार्टर फायनलमध्ये मुंबईची लढत उत्तराखंडशी (Mumbai vs Uttarakhand) होणार आहे. बेंगळुरूमध्ये 6 ते 10 जून रोजी होणाऱ्या या लढतीपूर्वी मुंबईला धक्का बसला आहे. चेन्नई सुपर किंग्सकडून (Chennai Super Kings) यंदाचा आयपीएल सिझन गाजवणारा शिवम दुबे (Shivam Dube) या स्पर्धेतून बाहेर झाला आहे.
मुंबईचा अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) दुखापतीमुळे दोन महिने क्रिकेटपासून दूर आहे. अजिंक्यपाठोपाठ शिवम दुबे देखील टीममध्ये नसल्यानं मुंबईला धक्का बसला आहे. टीम इंडिया आणि दिल्ली कॅपिटल्सचा तरूण खेळाडू पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) रणजी स्पर्धेत मुंबईची कॅप्टनसी करणार आहे.
मुंबईचे माजी फास्ट बॉलर सलिल अंकोलच्या निवड समितीनं 21 वर्षांच्या मुशीर खानचा टीममध्ये समावेश केला आहे. वेगवेगळ्या वयोगटातील क्रिकेटमध्ये त्यानं चांगली कामगिरी केली आहे. मुशीरचा मोठा भाऊ सरफराज खानही मुंबईच्या टीममध्ये आहे. सरफराजनं सातत्यानं मुंबईकडून रणजी स्पर्धेत मोठी इनिंग खेळली आहे.
रणजी स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये उत्तराखंड विरूद्धच्या लढतीमध्ये मुंबईचं पारडं जड आहे. ही लढत जिंकल्यात मुंबईची टीम सेमी फायनलमध्ये प्रवेश करेल. बंगाल विरूद्ध झारखंड, कर्नाटक विरूद्ध उत्तर प्रदेश, पंजाब विरूद्ध मध्य प्रदेश या अन्य क्वार्टर फायनल होणार आहेत.
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यातून वगळण्याच्या प्रकरणात साहानं सोडलं मौन, म्हणाला...
मुंबईची टीम : पृथ्वी शॉ (कॅप्टन), यशस्वी जैयसवाल, भूपेन लालवानी, अरमान जाफर, सरफराज खान, सुवेद पारकर, आकर्षित गोमेल, आदित्य तारे, हार्दिक तमोर, अमन खान, सैराज पाटिल, शम्स मुलानी, ध्रुमिल मटकर, तनूश कोटियन, शशांक अटर्डे, धवल कुलकर्णी , तुषार देशपांडे, मोहित अवस्थी, रोयस्तान डायस, सिद्धार्थ राऊत आणि मुशीर खान
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.