मुंबई, 25 मे : हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) कॅप्टनसीमध्ये खेळणाऱ्या गुजरात टायटन्सनं (Gujarat Titans) आयपीएल स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. गुजरातनं मंगळवारी कोलकातामध्ये झालेल्या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सचा (GT vs RR) 7 विकेट्सनं पराभव केला. या विजयानंतर हार्दिकनं त्याच्या टीममधील खेळाडूंची प्रशंसा केली. त्याचबरोबर मुंबई इंडियन्स विरूद्धच्या मॅचमधील झालेली चूक सुधारल्याचंही सांगितलं.
हार्दिकनं मॅचनंतर सांगितलं की, 'मी सध्या फार विचार करत नाहीय. टीममधील सर्व 23 खेळाडूंच्या वेगवेगळ्या भूमिका आहे. ते सर्व जणच निरनिराळ्या पद्धतीनं मदत करत असतात. मी डेव्हिड मिलरला इतकंच सांगितलं की तुमच्या आजूबाजूला चांगले लोकं असतील तर तुमच्या बाबतीमध्ये चांगलंच घडतं.
जे खेळाडू प्लेईंग 11 मध्ये नाहीत त्यांची देखील टीमनं चांगली कामगिरी करावी अशीच इच्छा आहे. राशिद खाननं संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी केली. मला मिलरचा अभिमान आहे. मी त्याला आपण खेळाचा आदर करायला पाहिजे असं सांगितलं. मुंबई इंडियन्स विरूद्ध आम्ही ती चूक केली होती, इथं आम्ही खेळाचा आदर केला. आम्हाला दोघांनाच ही मॅच संपवायची होती. माझ्या टीमला गरज आहे, तिथं मी पुढे येतो. मला बॅटींग कुठं हवीय याचा मी विचार करत नाही. मला फक्त टीमसाठी खेळल्यानंतरच यश मिळालं आहे. प्रत्येकानं या यशामध्ये वाटा उचलला पाहिजे हे निश्चित करण्याचा माझा प्रयत्न असतो,' अशी भावना हार्दिकनं बोलून दाखवली.
IPL 2022 : Riyan Parag ला काय झालंय? एकाच मॅचमध्ये काढला 2 सिनिअर्सवर राग
डेव्हिड मिलरने प्रसिद्ध कृष्णाच्या 20व्या ओव्हरच्या पहिल्या तिन्ही बॉलना तीन सिक्स मारून गुजरातला थरारक विजय मिळवून दिला.डेव्हिड मिलरने 38 बॉलमध्ये 178.95 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 68 रन केले, यामध्ये 5 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. याशिवाय गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) 27 बॉलमध्ये नाबाद 40 रनची खेळी केली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद 106 रनची भागिदारी करत गुजरातला विजय मिळवून दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.