मुंबई, 24 मे : आयपीएल 2022 मधील 70 सामन्यांनतर 'प्ले ऑफ' मधील 4 टीम ठरल्या आहेत. आता या आठवड्यात या चार टीमपैकी एकाचं विजेतेपदाचं स्वप्न पूर्ण होईल. या सिझनमधील पहिला क्वालिफायर सामना गुजरात टायटन्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स (GT vs RR) यांच्यात होणार आहे. गुजरात टायटन्स यंदा पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळत आहे. तर, 2008 साली विजेतेपद पटकावलेल्या राजस्थाननं 2018 नंतर पहिल्यांदाच 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश केला आहे.
गुजरातचा कॅप्टन हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) त्याच्या सर्व खेळाडूंचा हुशारीनं वापर केला आहे. राशिद खानची अचूक बॉलिंग तसंच डेव्हिड मिलर आणि राहुल तेवातिया या आक्रमक जोडीनं फिनिशर म्हणून पार पाडलेली भूमिका गुजरातच्या कामगिरीत निर्णायक ठरली आहे. तर संजू सॅमसनच्या (Sanju Samson) राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंनी ऑरेंज आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत आघाडी घेतली आहे. जोस बटलर आणि युजवेंद्र चहल या जोडीनं या शर्यतीत आघाडी घेतलीय. त्याचबरोबर अनुभवी आर. अश्विननं त्याच्या बॉलिंगमधील विविधता आणि बॅटींगनं सेकंड हाफमध्ये सर्वांना प्रभावित केले आहे.
IPL 2022 Qualifier 1, GT vs RR Dream 11
कॅप्टन: हार्दिक पंड्या
व्हाईस कॅप्टन: जोस बटलर
विकेट किपर: जोस बटलर
बॅटर: डेव्हिड मिलर, शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, ऋद्धिमान साहा, संजू सॅमसन
ऑल राऊंडर: हार्दिक पंड्या, आर अश्विन
बॉलर: युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, ट्रेंट बोल्ट
IPL 2022, RR vs GT : 2 टीमच नाही तर दोन खेळाडूंमध्येही होणार श्रेष्ठत्वाची लढाई
गुजरात टायटन्स: हार्दिक पंड्या (कॅप्टन), अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, गुरकीरत सिंह, बी साई सुदर्शन, शुभमन गिल, राहुल तेवतिया, विजय शंकर, मॅथ्यू वेड, रहमानुल्ला गुरबाज, ऋद्धिमान साहा, अल्झारी जोसेफ, दर्शन नालकंडे, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी, नूर अहमद, प्रदीप सांगवान, राशिद खान, आर. साई किशोर, वरुण आरोन, यश दयाल.
राजस्थान रॉयल्स: संजू सॅमसन (कॅप्टन), जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, शिमरोन हेटमायर, देवदत्त पडिक्कल, प्रसिद्ध कृष्णा, युजवेंद्र चहल, रियान पराग, केसी करियप्पा, नवदीप सैनी, ओबेद मैकॉय, अनुनय सिंह, कुलदीप सेन, करुण नायर, ध्रुव जुरेल, तेजस बरोका, कुलदीप यादव, शुभम गढ़वाल, जेम्स नीशाम, नाथन कूल्टर-नाइल, रेसी वान डेर डुसेन, डेरिल मिशेल आणि कॉर्बिन बॉश.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.