मुंबई, 25 मे : डेव्हिड मिलरचे (David Miller) आक्रमक अर्धशतक आणि मिलर-पांड्याची शतकी भागिदारी यामुळे गुजरात टायटन्सनं (Gujrat Titans) आयपीएल फायनलमध्ये प्रवेश केला आहे. गुजरातनं पहिल्या क्वालिफायरमध्ये राजस्थान रॉयल्सचा (GT vs RR) 7 विकेट्सनं पराभव केला. मिलरनं या मॅचमध्ये 38 बॉलमध्ये 178.95 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 68 रन केले. त्यानं शेवटच्या ओव्हरमध्ये सलग 3 सिक्स लगावत गुजरातच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयानंतर मिलरनं खास ट्विट करत राजस्थान रॉयल्सची माफी मागितली आहे.
मिलर यापूर्वी राजस्थान रॉयल्सचा सदस्य होता. त्याला आयपीएल 2020 मध्ये राजस्थाननं खरेदी केले होते. पण, त्यांनी त्याला पूर्ण संधी दिलीच नाही. आयपीएल 2020 मध्ये मिलर 1 सामने खेळला. मागील वर्षी त्याला 9 सामने मिळाले. याचाच अर्थ मागील दोन सिझनमध्ये मिलर फक्त 10 सामने खेळला. मिलरलाही मागील दोन सिझनमध्ये फार यश मिळालं नाही. त्याला या सिझनपूर्वी राजस्थाननं रिलीज केले होते. त्यामुळे राजस्थानवरील विजयानंतर मिलरनं त्याच्या माजी आयपीएल टीमची माफी मागितली आहे.
सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असणाऱ्या राजस्थान रॉयल्सच्या ट्विटर हँडलनंही मिलरला उत्तर दिलं आहे. त्यांनी एक मिम शेअर करत 'दुश्मन न करे दोस्त ने वह काम किया है', असं ट्विट केलं आहे. मिलर आणि राजस्थान रॉयल्समध्ये झालेली सोशल मीडियावरील ही जुगलबंदी सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे.
मिलरनं या सिझनमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यानं आत्तापर्यंत 15 सामन्यात 64 ची सरासरी आणि 141 च्या स्ट्राईक रेटनं 449 रन केले आहेत. आयपीएल स्पर्धेतील त्याची ही आजवरची चांगली कामगिरी आहे. त्यानं यापूर्वी चेन्नई सुपर किंग्स विरूद्धच्या सामन्यातही टीमला अडचणीतून बाहेर काढून विजय मिळवला दिला होता.
IPL 2022 : हार्दिक आणि मिलरनं सुधारली 'ती' चूक, गुजरातनं मारली फायनलमध्ये धडक
गुजरातकडून कर्णधार हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) 27 बॉलमध्ये नाबाद 40 रनची खेळी केली. राजस्थानने दिलेल्या या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या गुजरातची सुरूवात खराब झाली होती. इनिंगच्या दुसऱ्याच बॉलला ऋद्धीमान साहाला ट्रेन्ट बोल्टने शून्य रनवर आऊट केलं. यानंतर शुभमन गिल आणि मॅथ्यू वेडने गुजरातची इनिंग सावरली. शुभमन गिल आणि मॅथ्यू वेड यांनी प्रत्येकी 35-35 रन केले. राजस्थानकडून बोल्ट आणि ओबेड मकॉय यांना प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.