जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : CSK च्या पराभवानंतर माजी खेळाडूंची धोनीवर टीका! म्हणाले, 'त्याने....

IPL 2022 : CSK च्या पराभवानंतर माजी खेळाडूंची धोनीवर टीका! म्हणाले, 'त्याने....

IPL 2022 : CSK च्या पराभवानंतर माजी खेळाडूंची धोनीवर टीका! म्हणाले, 'त्याने....

सीएसकेच्या पराभवानंतर माजी क्रिकेटपटूंनी महेंद्रसिंह धोनीवर (MS Dhoni) टीका केली आहे. धोनीनं कॅप्टनसी सोडली असली तरी त्याचा अजूनही मैदानात हस्तक्षेप खूप असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 1 एप्रिल : आयपीएल 2022 पूर्वी (IPL 2022) महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) आश्चर्यकारक निर्णय घेतला. धोनीनं चेन्नई सुपर किंग्सच्या (Chennai Super Kings) कॅप्टनपदाचा राजीनामा दिला. धोनीच्या जागी रविंद्र जडेजाची (Ravindra Jadeja) कॅप्टन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जडेजाच्या कॅप्टनशीपमध्ये सीएसकेची सुरूवात खराब झाली आहे. त्यांचा पहिल्या दोन्ही मॅचमध्ये पराभव झाला. आयपीएल स्पर्धेच्या 15 सिझनमध्ये पहिल्यांदाच सीएसकेनं पहिल्या दोन्ही मॅच गमावल्या आहेत. गुरुवारी लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) विरूद्ध झालेल्या मॅचमध्ये सीएसकेला 210 रनचं संरक्षण करण्यातही अपयश आले. सीएसकेच्या या पराभवानंतर माजी क्रिकेटपटूंनी महेंद्रसिंह धोनीवर टीका केली आहे. धोनीनं कॅप्टनसी सोडली असली तरी त्याचा अजूनही मैदानात हस्तक्षेप खूप असल्याचं मत टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू अजय जडेजा आणि पार्थिव पटेल यांनी व्यक्त केलं आहे. ‘क्रिकबझ लाईव्ह’ कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात बोलताना जडेजा म्हणाला की, ‘लीग स्टेजमधील शेवटची मॅच आहे आणि ‘प्ले ऑफ’ चं भवितव्य या मॅचवर अवलंबून आहे, अशा परिस्थितीमध्ये धोनीनं निर्णय घेतले तर योग्य आहे. पण, ही स्पर्धेतील फक्त दुसरीच मॅच आहे. धोनी हा मोठा खेळाडू आहे. मी त्याचा खूप मोठा फॅन आहे.पण, एक फॅन म्हणूनही मला हे आवडलं नाही.’ पार्थिव पटेलनंही या विषयावर बोलताना जडेजाच्या मताशी सहमती दर्शवली. मित्राच्या बायकोशी केलं लग्न, क्रिकेट विश्वात सर्वात वादग्रस्त आहे विजयची Love Story ‘नवी कॅप्टन तयार करणे ही जर योजना असेल तर तुम्ही त्याला पूर्ण स्वातंत्र्य द्यायला हवे. जडेजाला नेतृत्त्व करण्याची संधी मिळाली तरच तो कॅप्टन होईल. तो चुकांमधूनच शिकणार आहे.’ चेन्नई सुपर किंग्सचा पहिल्या मॅचमध्ये कोलकाता नाईट रायडर्सनं पराभव केला होता. आता चेन्नईची पुढील मॅच रविवारी पंजाब किंग्ज विरूद्ध होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात