मुंबई, 29 मे : आयपीएल स्पर्धेच्या 15 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका सिझनमध्ये 1 हजारपेक्षा जास्त सिक्स लगावण्यात आले आहेत. राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) जोस बटलरनं (Jos Buttler) सर्वाधिक 45 सिक्स लगावले आहेत. आता फायनलमध्ये त्याला सिक्सर्सचे अर्धशतक करण्याची संधी आहे. इंग्लंडचाच लियाम लिव्हिंगस्टोन (Liyam Livingstone) या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. लिव्हिंगस्टोन या आयपीएलमध्ये पंजाब किंग्जकडून खेळला. पंजाबची टीम ‘प्ले ऑफ’ मध्ये प्रवेश करू शकली नाही. त्यानं आयपीएलमध्ये सिक्सर्सचा पाऊस पाडला आहे. लिव्हिंगस्टोननं या सिझनमध्ये 34 सिक्स लगावले असून त्यामध्ये सर्वात लांब 117 मीटर सिक्सचा समावेश आहे. आयपीएल 2022 नंतर लिव्हिंगस्टोन इंग्लंडमध्ये गेला असून तो सध्या टी20 ब्लास्ट स्पर्धा खेळत आहे. लिव्हिंगस्टोननं या स्पर्धेतही आयपीएलप्रमाणे पॉवर हिटींग सुरू केली आहे. लँकशरकडून खेळणाऱ्या लिव्हिंगस्टोननं यॉर्कशर विरूद्ध इतका मोठा सिक्स मारला तो सरळ स्टेडिअमच्या बाहेर गेला.
That. Is. Huge.
— Vitality Blast (@VitalityBlast) May 27, 2022
🔥 @liaml4893 🔥#Blast22 #RosesT20 pic.twitter.com/FAAaWKg85P
व्हॅटिलिटी ब्लास्टच्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवरून या सिक्सचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. लिव्हिंग स्टोनचा हा सिक्स पाहून फॅन्ससह कॉमेंटेटरही थक्क झाले होता. लिव्हिंगस्टोन यावेळी मोठी खेळी करू शकला नाही. तो 16 बॉलमध्ये 23 रन करून आऊट झाला. या खेळीत त्यानं 2 फोर आणि 1 सिक्स लगावला. IPL 2022 Final : शेन वॉर्नच्या आठवणीनं संजू सॅमसन भावुक, टीमला केलं खास आवाहन या मॅचमध्ये लँकशरनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 आऊट 183 रन केले. लँकशरकडून फिल सॉल्टनं सर्वात जास्त 59 रन केले. तर टीम डेव्हिडनं 18 बॉलमध्ये 35 रनची वादळी खेळी केली. यॉर्कशरकडून हॅरीस राऊफ आणि जॉर्डन थॉम्पसननं 2-2 विकेट्स घेतल्या. यॉर्कशरकडून टॉम कोहलरनं 67 आणि हॅरी ब्रूकनं 72 रन करत हा सामना बरोबरीत सोडवला.