जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 Final : शेन वॉर्नच्या आठवणीनं संजू सॅमसन भावुक, टीमला केलं खास आवाहन

IPL 2022 Final : शेन वॉर्नच्या आठवणीनं संजू सॅमसन भावुक, टीमला केलं खास आवाहन

IPL 2022 Final : शेन वॉर्नच्या आठवणीनं संजू सॅमसन भावुक, टीमला केलं खास आवाहन

आयपीएल विजेतेपदापासून एक पाऊल दूर असलेला राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसन (Sanju Samson) यावेळी शेन वॉर्नच्या आठवणीनं भावुक झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 29 मे : आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या सिझनमध्ये (IPL 2008) शेन वॉर्नच्या (Shane Warne) कॅप्टनसीमध्ये राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals) विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर आता 14 वर्षांनी राजस्थाननं फायनलमध्ये प्रवेश केला असून त्यांना पुन्हा एकदा विजेतेपद पटकावण्याची संधी आहे. राजस्थाननं क्वालिफायर 2 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा पराभव करत फायनल गाठली आहे. आयपीएल विजेतेपदापासून एक पाऊल दूर असलेला राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसन (Sanju Samson) यावेळी शेन वॉर्नच्या आठवणीनं भावुक झाला होता. आरसीबीवर विजय मिळवल्यानंतर जोस बटलरशी (Jos Buttler) बोलताना त्यानं वॉर्नसाठी आणखी एक पाऊल पुढं टाकण्याचं आवाहन टीमला केलं. आरसीबी विरूद्ध शतक झळकावणाऱ्या बटलरनं या संभाषणाची सुरूवात करताना सांगितलं की, ‘शेन वॉर्नचा राजस्थान रॉयल्सवर मोठा प्रभाव आहे. त्यानं पहिल्या सिझनमध्ये टीमला विजय मिळवून दिला. आज तो मोठ्या अभिमानानं आपला खेळ पाहात असेल, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे.’ राजस्थान रॉयल्सच्या फायनलपर्यंतच्या वाटचालीत जोस बटलरचा मोठा वाटा आहे. 16 सामन्यांमध्ये त्याने 150.64 च्या स्ट्राईक रेटने आणि 58.43 च्या सरासरीने 818 रन केले आहेत, यात 4 शतकं आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे. एकाच मोसमात सर्वाधिक 4 शतकं करण्याच्या विराट कोहलीच्या (Virat Kohli) विक्रमाचीही बटलरने बरोबरी केली आहे. विराटनेही 2016 आयपीएलमध्ये 4 शतकं केली होती. राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसन देखील शेन वॉर्नबद्दल बोलताना भावुक झाला. ‘ही स्पर्धा सुरूवातीपासूनच त्याची होती. आता आपल्याला आणखी एक पाऊल पुढं टाकण्याची गरज आहे. हे अतिशय महत्त्वाचं आहे. मला या विषयावर फार बोलायचं नाही. पण आपण त्याच्यासाठी खास करण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहोत.’ IPL 2022 Final : समारोपाच्या कार्यक्रमाला ‘बॉलिवूड तडका’, फायनलच्या वेळेतही बदल संजू सॅमसननं यावेळी आयपीएल 2008 च्या फायनलची आठवणही सांगितली. ‘मी त्यावेळी खूप लहान होता. मला आठवतंय की मी केरळमध्ये अंडर 16 स्पर्धा खेळत होतो. मी मित्रांसोबत ती मॅच पाहिली. शेन वॉर्ननं सोहेल तन्वीरसोबत शेवटचा रन काढला. तो अविस्मरणीय प्रसंग होता,’ असे सॅमसन म्हणाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात