मुंबई, 9 एप्रिल : गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) ऑल राऊंडर राहुल तेवातियानं (Rahul Tewatia) शेवटच्या 2 बॉलवर सिक्स लगावत टीमला विजय मिळवून दिला. पंजाब किंग्जनं (Punjab Kings) दिलेलं 190 रनचं आव्हान पूर्ण करण्यासाठी गुजरातला शेवटच्या 2 बॉलवर 12 रन हवे होते. त्यावेळी तेवातियानं ओडियन स्मिथला दोन सिक्स मारत गुजरातला विजय मिळवून दिला. या कामगिरीनंतर क्रिकेट विश्वात सर्वत्र तेवातियाचीच चर्चा आहे. टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी तेवातियाच्या या दोन सिक्सचं रहस्य सांगितलं आहे.
शास्त्रींनी 'इएसपीएन क्रिकइन्फो' शी बोलताना सांगितलं की, 'तेवातियानं बॉल कुठे मारायचा आहे हे आधीच ठरवलं होतं. त्यासाठी लवकर पोझिशनमध्ये येऊन स्वत:ला जास्त वेळ देण्याची त्याची योजना होती. तुम्ही शेवटचा बॉल पाहिला तर तेवातिया ऑफ स्टंपच्या बाहेर उभा होता आणि तिथंच बॉल येईल अशी त्याची आशा होती. प्रत्यक्षातही तसंच घडलं. बॉलर काय विचार करत असेल याचा अचूक अंदाज तेवातियाला आला होता.
ओडियन स्मिथ अधिक चांगली बॉलिंग करू शकला असता. त्याला यॉर्कर टाकण्याची संधी होती, तसंच तो राऊंड द विकेट येऊनही बॉलिंग करू शकला असता पण त्यानं तेवातिया ज्या भागात जास्त मजबूत आहे, तिथंच बॉल टाकला.' या शब्दात शास्त्रींनी तेवातियाच्या दोन सिक्सचं रहस्य सांगितलं आहे.
IPL 2022 Points Table : गुजरातसाठी पहिला नंबर दूरच, मुंबई आणि चेन्नईला मोठी संधी
धोनीच्या क्लबमध्ये एन्ट्री
गुजरात टायटन्सनं यंदा 9 कोटींमध्ये तेवातियाला खरेदी केले आहे. फ्रँचायझीचा हा विश्वास त्यानं पंजाब विरूद्धच्या मॅचमध्ये सार्थ ठरवला. यापूर्वी फक्त महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) केलेल्या रेकॉर्डची बरोबरी तेवातियानं केली आहे. धोनीनं आयपीएल 2016 मध्ये रायझिंग पुणे सुपर जायंट्सकडून खेळताना शेवटच्या दोन बॉलवर 12 रन हवे होते त्यावेळी 2 सिक्स मारत टीमला विजय मिळवून दिला होता. धोनीनं अक्षर पटेलच्या बॉलिंगवर हे सिक्स लगावले होते. विशेष म्हणजे त्यावेळी अक्षर पटेलही पंजाब किंग्जकडून खेळत होता. धोनीच्या या कामगिरीची तेवातियानं सहा वर्षांनी बरोबरी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Gujarat Titans, Ipl 2022, Punjab kings, Ravi shastri