जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 Points Table : गुजरातसाठी पहिला नंबर दूरच, मुंबई आणि चेन्नईला मोठी संधी

IPL 2022 Points Table : गुजरातसाठी पहिला नंबर दूरच, मुंबई आणि चेन्नईला मोठी संधी

IPL 2022 Points Table : गुजरातसाठी पहिला नंबर दूरच, मुंबई आणि चेन्नईला मोठी संधी

आयपीएलच्या या मोसमात गुजरातने अजूनपर्यंत एकही मॅच गमावलेली नाही. 3 सामन्यांमध्ये त्यांच्या खात्यात 3 विजय आहेत. या विजयानंतरही गुजरातची टीम पॉईंट टेबलमध्ये नंबर 1 वर नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 9 एप्रिल : राहुल तेवातियानं (Rahul Tewatia) ओडियन स्मिथला शेवटच्या दोन बॉलवर  2 सिक्स मारत गुजरातला सनसनाटी विजय मिळवून दिला. आयपीएलच्या या मोसमात गुजरातने अजूनपर्यंत एकही मॅच गमावलेली नाही. 3 सामन्यांमध्ये त्यांच्या खात्यात 3 विजय आहेत. या विजयानंतरही गुजरातची टीम पॉईंट टेबलमध्ये नंबर 1 वर नाही. पंजाबवरील विजयानंतर गुजरातची टीम पॉईंट टेबलमध्ये नंबर 2 वर पोहचली आहे. श्रेयस अय्यरची (Shreyas Iyer) कोलकाता नाईट रायडर्स (KKR) 4 मॅचमध्ये 3 विजयासह नंबर 1 वर आहे. कोलकाताचा रनरेट हा गुजरातपेक्षा जास्त असल्यानं ती टीम नंबर वनवर आहे. तर लखनऊची टीम आता तिसऱ्या क्रमांकावर घसरली आहे. कोलकाता, गुजरात आणि लखनऊ या सर्व टीमचे सध्या 3 विजयासह 6 पॉईंट्स आहेत. राजस्थाव रॉयल्स 3 मॅचनंतर 4 पॉईंट्ससह चौथ्या क्रमांकावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचेही 3 मॅचनंतर 4 पॉईंट्स असून ती टीम सध्या पाचव्या क्रमांकावर आहे. तर गुजरात विरूद्ध झालेल्या पराभवानंतर पंजाब किंग्जची सहाव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. तीन मॅचमध्ये एकच विजय मिळवलेल्या दिल्ली कॅपिटल्स सातव्या क्रमांकावर आहे. मुंबई आणि चेन्नईला संधी आयपीएल स्पर्धेतील सर्वात दोन यशस्वी टीम असलेल्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांना अद्यापही पॉईंट टेबलमध्ये खातं उघडता आलेलं नाही. दोन्ही टीमनी या मोसमात त्यांच्या सुरुवातीच्या तिन्ही मॅच गमावल्या आहेत. 10 टीमच्या या स्पर्धेत चेन्नई आठव्या आणि मुंबई नवव्या क्रमांकावर आहे. चेन्नई सुपर किंग्सची शनिवारी लढत सनरायझर्स हैदराबादशी आहे. सनरायझर्सचीही या सिझनमध्ये सुरूवात खराब झालीय. त्यांनी पहिल्या दोन मॅच गमावल्या असून पॉईंट टेबलमध्ये ती टीम सर्वात तळाशी आहे. ही लढत जिंकून पॉईंट टेबलमध्ये खातं उघडण्याची मोठी संधी चेन्नईला आहे. IPL 2022 : 9 महिन्यांपूर्वीची भविष्यवाणी खरी ठरली, गुजरातच्या खेळाडूची पहिल्याच मॅचमध्ये कमाल तर, मुंबई इंडियन्सही शनिवारी पहिला विजय मिळवण्याच्या निर्धारानं उतरणार आहे. मुंबई इंडियन्सची लढत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूशी होणार आहे. यापूर्वीच्या तीन्ही लढतीमध्ये निर्णायक क्षणी झालेल्या चुकांचा फटका मुंबईला बसला होता. या चूका टाळल्या तर आरसीबी विरूद्ध विजय मिळवत पॉईंट टेबलमध्ये खातं उघडणे मुंबईसाठी अवघड नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात