Home /News /sport /

IPL 2022 : धोनीनं 3 वर्षांनी केली इतिहासाची पुनरावृत्ती, रोहितला नडली गंभीर चूक

IPL 2022 : धोनीनं 3 वर्षांनी केली इतिहासाची पुनरावृत्ती, रोहितला नडली गंभीर चूक

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आयपीएल 2022 मधील पहिल्या विजयाच्या उंबरठ्यावरून पराभूत झाले आहे. या मॅचमध्ये महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) इतिहासाची पुनरावृत्ती केलीच त्याचबरोबर रोहित शर्मालाही (Rohit Sharma) एक चूक नडली.

    मुंबई, 22 जानेवारी :  मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आयपीएल 2022 मधील पहिल्या विजयाच्या उंबरठ्यावरून पराभूत झाले आहे. गुरूवारी झालेल्या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्सनं (Chennai Super Kings) मुंबईचा अगदी शेवटच्या बॉलवर पराभव केला.  महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) या विजयाचा हिरो ठरला. त्यानं शेवटच्या 4 बॉलमध्ये 16 रन करत चेन्नईला मॅच जिंकून दिली. अनुभवी धोनीनं यावेळी शांत चित्तानं खेळी करत 3 वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती केली. 3 वर्षांपूर्वी काय झाले? तीन वर्षांपूर्वी म्हणजेच आयपीएल 2019 मध्ये जयदेव उनाडकत (Jaydev Unadkat) राजस्थान रॉयल्सकडून खेळत होता. त्यावेळी धोनीनं उनाडकतच्या शेवटच्या 3 बॉलवर 3 सिक्स लगावले होते. धोनीचे शेवटच्या ओव्हर्समधील तीन सिक्स मॅचमध्ये निर्णायक ठरले. चेन्नईनं ती मॅच फक्त 8 रननं जिंकली होती. धोनीनं उनाडकतच्या केलेल्या धुलाईचा इतिहास माहिती असूनही मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मानं (Rohit Sharma) त्याला पुन्हा एकदा धोनी मैदानात असताना शेवटची ओव्हर दिली. रोहितची ही चूक मुंबईला नडली. चेन्नईला शेवटच्या 4 बॉलमध्ये विजयासाठी 16 रन हवे होते. त्यावेळी धोनीनं 6,4,2 आणि 4 रन केले. धोनीनं शेवटच्या बॉलवर फोर लगावत चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मुंबई इंडियन्सचा लाजीरवाणा रेकॉर्ड आयपीएलच्या या मोसमातला मुंबईचा हा सलग सातवा पराभव आहे. यंदाच्या हंगामात मुंबईला अजून एकही मॅच जिंकता आलेली नाही. याचसोबत मुंबईच्या नावावर लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. आयपीएलच्या एका मोसमात पहिल्या सात मॅच गमावणारी मुंबई पहिलीच टीम ठरली आहे. याआधी 2013 साली दिल्ली डेयरडेव्हिल्स (Delhi Dare Devils) आणि 2019 साली आरसीबीने (RCB) सुरूवातीच्या 6 मॅच गमावल्या आहेत. IPL 2022 : शेवटच्या ओव्हरमध्ये दिसली धोनीच्या पॉवर! थरारक विजयानंतर जडेजा नतमस्तक, VIDEO आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये मुंबई इंडियन्स शेवटच्या म्हणजेच दहाव्या क्रमांकावर आहे. तर चेन्नई सुपर किंग्सने 7 पैकी 2 मॅच जिंकल्या असून त्यांचा पॉईंट टेबलमध्ये नववा क्रमांक आहे.  मुंबई आणि चेन्नई या आयपीएल इतिहासातल्या सगळ्यात यशस्वी टीम आहेत. मुंबईने 5 वेळा आणि चेन्नईने 4 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे, पण यंदा या दोन्ही टीम तळाला आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Csk, Ipl 2022, MS Dhoni, Mumbai Indians, Rohit sharma

    पुढील बातम्या