शेवटच्या ओव्हरमध्ये चेन्नईला 17 रन हवे होते, तेव्हा उनाडकटने पहिल्या बॉलला प्रिटोरियसची विकेट घेतली, यानंतर बॅटिंगला आलेल्या ब्राव्होने एक रन काढून धोनीला स्ट्राईक दिला. तिसऱ्या बॉलला धोनीने सिक्स मारली, मग चौथ्या बॉलला फोर मारून सीएसकेला विजयाजवळ पोहोचवलं. पाचव्या बॉलला 2 रन काढल्यानंतर शेवटच्या बॉलला सीएसकेला 4 रन हव्या होत्या, तेव्हा धोनीने फोर मारून मुंबईच्या हातचा विजयाचा घास हिरावून घेतला. IPL 2022 : धोनीची रणनिती, पोलार्ड अडकला जाळ्यात, त्या गेम प्लाननंतर पुढच्याच बॉलला आऊट आयपीएलच्या या मोसमातला मुंबई इंडियन्सचा हा लागोपाठ सातवा पराभव आहे. या हंगामात मुंबईला अजून एकही मॅच जिंकता आली नाही. तर चेन्नई सुपर किंग्सने 7 पैकी 2 मॅच जिंकल्या असून 5 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नई नवव्या तर मुंबई शेवटच्या म्हणजेच दहाव्या क्रमांकावर आहे.How @imjadeja & Rayadu thanked #Dhoni for today's #CSK win#CSKvsMi #IPL pic.twitter.com/GZkAzaSCrn
— Prashant (@prashantlohar7) April 21, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Csk, Ipl 2022, MS Dhoni, Mumbai Indians, Ravindra jadeja