मुंबई इंडियन्सनं या ऑक्शनपूर्वी कॅप्टन रोहितसह जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि कायरन पोलार्ड यांना रिटेन केले होते. तर इशान किशनला (Ishan Kishan) 15.25 कोटींची विक्रमी किंमत देऊन खरेदी केले. इशान या सिझनमधील सर्वात महागडा खेळाडू आहे. त्यामुळे त्याच्यावर चांगल्या कामगिरीसाठी दबाव असेल. IPL 2022 : मुंबईच्या खेळाडूने नेट प्रॅक्टिसमध्येच पक्कं केलं टीममधलं स्थान! VIDEO पाहून व्हाल अवाक आयपीएल स्पर्धेची सुरूवात 26 मार्च रोजी होणार आहे. तर, मुंबई इंडियन्सची पहिली मॅच 27 मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध (Mumbai Indians vs Delhi Capitals) होणार आहे. मुंबईचे क्विंटन डी कॉक, हार्दिक पांड्या, ट्रेन्ट बोल्ट हे दिग्गज खेळाडू आता दुसऱ्या टीममध्ये आहेत. तर दिल्लीची संपूर्ण भिस्त कॅप्टन ऋषभ पंतवर (Rishabh Pant) असेल.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Ipl 2022, Mumbai Indians, Rohit sharma