जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : मैदानात हताश बसलेल्या सूर्याला पोलार्डनं दिला धीर, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं!

IPL 2022 : मैदानात हताश बसलेल्या सूर्याला पोलार्डनं दिला धीर, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं!

IPL 2022 : मैदानात हताश बसलेल्या सूर्याला पोलार्डनं दिला धीर, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं!

मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) सलग पाचव्या पराभवामध्ये निर्णायक क्षणी झालेल्या रन आऊटचा महत्त्वाचा वाटा होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 14 एप्रिल :  मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) सलग पाचव्या पराभवामध्ये निर्णायक क्षणी झालेल्या रन आऊटचा महत्त्वाचा वाटा होता. पंजाब किंग्ज (Punjab Kings) विरूद्ध बुधवारी झालेल्या मॅचमध्ये तिलक वर्मा (Tilak Varma) आणि कायरन पोलार्ड (Kieron Pollard) रन आऊट झाले. या दोन्ही रन आऊटमध्ये सूर्यकुमार यादव (Suryaumar Yadav) त्यांचा पार्टनर होता. यामधील पोलार्ड रन आऊट होण्याची घटना 17 व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर घडली. वैभव अरोरा ती ओव्हर टाकत होता. पोलार्डनं त्याच्या ओव्हरमधील पहिलाच बॉल लाँग ऑनला लगावला. त्यावेळी तिथं फिल्डिंग करत असलेल्या ओडियन स्मिथच्या हातून मिस फिल्ड झाली. पोलार्डनं त्याचा फायदा घेण्यासाठी दुसरा रन काढण्याचा प्रयत्न केला. या अतिरिक्त रन काढण्याच्या प्रयत्नात तो रन आऊट झाला. ओडियन स्मिथनं विकेट किपर जितेश शर्माला थेट थ्रो करत पोलार्डला रन आऊट केले. सूर्या आणि पोलार्ड यांच्यातील गोंधळामुळे पोलार्डला विकेट गमावावी लागली. त्यामुळे सूर्या चांगलाच निराश झाला. तो नॉन स्ट्रायकर एंडला खालीच बसला. त्यावेळी पॅव्हिलियनमध्ये जाण्यापूर्वी पोलार्ड सूर्याजवळ गेला. त्याच्या जवळ गेला आणि त्याला त्यानं धीर दिला. पोलार्ड आऊट झाला तेव्हा सूर्यकुमार यादव 19 बॉलमध्ये 22 रन काढून खेळत होता. त्यानंतर त्यानं काही चांगले शॉट्स लगावले, पण तो मुंबईला विजय मिळवून देऊ शकला नाही. सूर्यानं 30 बॉलमध्ये 43 रन केले. त्याला रबाडानं आऊट केलं. T20 क्रिकेटमध्ये जबरदस्त रेकॉर्ड , 6 बॉलमध्ये पडल्या 6 विकेट्स! पाहा VIDEO मुंबईचा या मोसमातला हा लागोपाठ पाचवा पराभव आहे, यावेळी मुंबईला अजून एकही मॅच जिंकता आलेली नाही. पॉईंट्स टेबलमध्येही मुंबई शेवटच्या म्हणजेच 10व्या क्रमांकावर आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात