मुंबई, 14 एप्रिल : एका ओव्हरमधील सर्व 6 बॉलवर 6 विकेट्स पडण्याचा योग क्रिकेटमध्ये अगदीच दुर्मिळ आहे. नेपाळमधील प्रो क्लब चॅम्पिनशिप (Nepal Pro Club Championship 2022) स्पर्धेत हा विक्रम धाला आहे. मलेशिया क्लब इलेव्हन (Malaysia Club XI ) आणि पुश स्पोर्ट्स दिल्ली (Push Sports Delhi) यांच्यातील मॅचमध्ये हा प्रकार घडला आहे. यामध्ये मलेशियाचा डावखुरा स्पिनर वीरनदीप सिंहनं Virandeep singh) एकाच ओव्हरमध्ये 5 विकेट्स घेतल्या. यामध्ये हॅट्ट्रिकचाही समावेश होता.
या मॅचच्या पहिल्या इनिंगमधील 20 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. वीरनदीपनं पहिला बॉल वाईड टाकला. त्यानंतर पुढच्या बॉलवर मृगंक पाठकला आऊट केलं. दुसऱ्या बॉलवर इशान पांडे आऊट झाला. त्यानंतर पुढच्या 4 बॉलमध्ये 4 विकेट्स घेत त्यानं हॅट्ट्रिकसह नवा रेकॉर्ड केला. या मॅचमध्ये वीरनदीपनं फक्त 2 ओव्हर बॉलिंग केली. त्यामध्ये त्यानं 9 रन देत 5 विकेट्स घेतल्या. तर एक जण रन आऊट झाला.
2⃣0⃣th Over 6⃣ Balls 6⃣ Wickets 4⃣ in 4⃣ from the final 4 for the bowler 1⃣ Run Out
Unbelievable stuff from @Viran23 for the @MalaysiaCricket XI here in Bhairahawa, Nepal! Surely the first time in Cricket History there's been 6 Wickets in 6 Balls!?? pic.twitter.com/pVIsdlyEwt — Andrew Leonard (@CricketBadge) April 12, 2022
या मॅचमध्ये पुश स्पोर्ट्स दिल्लीनं पहिल्यांदा बॅटींग करत 9 आऊट 132 रन केले. कॅप्टन मृगंक पाठकनं सर्वात जास्त 39 रन केले. मयंक गुप्तानं 33 रन काढले. मलेशिया-11 नं 133 रनचं लक्ष्य 17.3 ओव्हर्समध्ये 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. कॅप्टन अहमद फैजनं नाबाद 39 रन केले. तर वीरनदीप सिंहनं ओपनर म्हणून 19 बॉलमध्ये 33 रनची खेळी केली. या खेळीत त्यानं 4 फोर आणि 2 सिक्स लगावले.
IPL 2022 : CSK सह टीम इंडियाला मोठा धक्का, प्रमुख खेळाडू 4 महिन्यांसाठी आऊट!
23 वर्षांच्या वीरनदीप सिंहनं मलेशियाकडून 23 इंटरनॅशनल मॅच खेळल्या आहेत. त्यानं 35 च्या सरासरीनं 5 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा इकोनॉमी रेट 8 पेक्षा जास्त आहे. तर 30 च्या सरासरीनं 4 अर्धशतकांसह 800 रन केले आहेत. यामध्ये त्याचा स्ट्राईक रेट 114 आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Icc, Nepal