मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : मुंबई इंडियन्सचा बॅड पॅच सुरूच, पाचव्या पराभवानंतर रोहितवर बंदीची टांगती तलवार

IPL 2022 : मुंबई इंडियन्सचा बॅड पॅच सुरूच, पाचव्या पराभवानंतर रोहितवर बंदीची टांगती तलवार

आयपीएल 2022 मधील मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) बॅड पॅच सुरूच आहे. बुधवारी झालेल्या मॅचमध्ये पंजाब किंग्जनं त्यांचा (MI vs PBKS) 12 रननं पराभव केला. या पराभवानंतर रोहितवर बंदीचा टांगती तलवार लागली आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 14 एप्रिल : आयपीएल 2022 मधील मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) बॅड पॅच सुरूच आहे. बुधवारी झालेल्या मॅचमध्ये पंजाब किंग्जनं त्यांचा (MI vs PBKS) 12 रननं पराभव केला.  मुंबईचा हा या स्पर्धेतील सलग पाचवा पराभव असून ही टीम अद्याप पॉईंट टेबलमध्ये सर्वात तळाशी आहे. आतापर्यंत एकही पॉईंट न कमावलेल्या मुंबई इंडियन्सला पंजाब किंग्ज विरूद्धच्या पराभवानंतर आणखी एक धक्का बसला आहे.

पंजाब विरूद्धच्या मॅचमध्ये स्लो ओव्हर रेटमुळे कॅप्टन रोहित शर्मासह (Rohit Sharma) संपूर्ण टीमवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या सिझनमध्ये दुसऱ्यांदा मुंबई इंडियन्सवर ही कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध झालेल्या मुंबईच्या पहिल्या पहिल्या मॅचमध्ये (MI vs DC) मुंबईवर ही कारवाई करण्यात आली होती.

IPL द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या वक्तव्यानुसार मुंबई इंडियन्सवर स्लो ओव्हर रेटसाठी कारवाई करण्यात आली आहे. 'आयपीएल 2022 मधील मुंबई इंडियन्सचे हे दुसरे प्रकरण आहे. त्यामुळे कॅप्टन रोहित शर्मावर 24 लाखांचा आर्थिक दंड आकारण्यात आलाय. तसंच टीममधील अन्य खेळाडूंवर 6 लाख रूपये किंवा 25 टक्के मॅच फिस यापैकी जे कमी असेल तितका दंड आकारण्यात येईल.'

आयपीएलच्या नियमानुसार 85 व्या मिनिटाला 20 वी ओव्हर सुरू होणं बंधनकारक आहे, पण मुंबईने निर्धारित वेळेत 20वी ओव्हर सुरू केली नाही. याआधी मागच्या मोसमापर्यंत 85 मिनिटांमध्ये प्रत्येक टीमला 20 ओव्हर पूर्ण करणं बंधनकारक होतं. मुंबई इंडियन्सनं ही चूक दुसऱ्यांदा केल्यानं रोहितवरील दंडाची रक्कम 12 लाखांवरून दुप्पट 24 लाख झाली आहे. आता ही चूक आणखी एकदा झाल्यास रोहितवर 30 लाख रूपये दंड आणि एक आयपीएल मॅचची बंदी घातली जाईल.

IPL 2022 : सूर्याच्या या 3 चुका मुंबई इंडियन्सना पडल्या महागात, पहिला विजय असा निसटला

त्यापूर्वी पंजाबने दिलेलं 199 रनचं आव्हान पार करण्यासाठी आलेल्या मुंबईला 20 ओव्हरमध्ये 9 आऊट 186  पर्यंतच मजल मारता आली. सलग पाचव्या पराभवानंतर मुंबईचं स्पर्धेतील आव्हान धोक्यात आलं आहे.

First published:

Tags: Ipl 2022, Mumbai Indians, Rohit sharma