मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : सूर्याच्या या 3 चुका मुंबई इंडियन्सना पडल्या महागात, पहिला विजय असा निसटला

IPL 2022 : सूर्याच्या या 3 चुका मुंबई इंडियन्सना पडल्या महागात, पहिला विजय असा निसटला

Photo-Mumbai Indians

Photo-Mumbai Indians

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians vs Punjab Kings) हाराकिरी सुरूच आहे. पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा 12 रनने पराभव झाला आहे. मुंबई इंडियन्सने केलेल्या तीन चुकांमध्ये सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सामिल होता.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

पुणे, 13 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians vs Punjab Kings) हाराकिरी सुरूच आहे. पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा 12 रनने पराभव झाला आहे. पंजाबने दिलेल्या 199 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने 20 ओव्हरमध्ये 186/9 पर्यंत मजल मारली. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि इशान किशन (Ishan Kishan) लवकर आऊट झाल्यानंतर डेवाल्ड ब्रेविस (Dewald Brevis) आणि तिलक वर्मा (Tilak Varma) यांनी पंजाबच्या बॉलिंगवर आक्रमण केलं, पण मोक्याच्या क्षणी झालेल्या चुकांचा मुंबई इंडियन्सना मोठा फटका बसला.

मुंबई इंडियन्सने केलेल्या तीन चुकांमध्ये सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सामिल होता. सूर्यकुमार आणि तिलक हे बॅटिंग करत असताना दोघांमध्ये गोंधळ झाला आणि यात तिलक वर्मा आऊट झाला. यानंतर सूर्या आणि कायरन पोलार्ड (Kieron Pollard) यांच्यातही असाच गोंधळ झाला आणि पोलार्डला त्याची विकेट गमवावी लागली.

17 व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलला पोलार्डने लॉन्ग ऑनला शॉट मारला, यानंतर पोलार्डने एक रन काढली, पण ओडियन स्मिथने फिल्डिंगमध्ये चूक केल्यानंतर सूर्याने पोलार्डला दुसरी रन घेण्यासाठी बोलावलं, पण खेळपट्टीच्या अर्ध्यावर आल्यावर सूर्याने पोलार्डला रनसाठी नकार दिला. सूर्याच्या या चुकीचा मोठा फटका मुंबईला बसला.

पोलार्डची विकेट गेल्यानंतर जयदेव उनाडकट (Jaydev Unadkat) बॅटिंगला आला, त्यामुळे सूर्यकुमार यादवने मॅचची सगळी सूत्र स्वत:च्या हातात घेतली. एका बाजूने तो एकटा खिंड लढवत होता, पण 19 व्या ओव्हरला त्याने आणखी एक चूक केली. मुंबईला विजयासाठी 10 बॉलमध्ये 22 रनची गरज होती, पण 19व्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलला एक रन मिळत असतानाही सूर्याने उनाडकटला स्ट्राईक दिला नाही. अखेर ओव्हरच्या चौथ्या बॉलला सूर्यकुमार यादव आऊट झाला आणि मुंबईचं मोसमातली पहिली मॅच जिंकण्याचं स्वप्न भंगलं.

मुंबईचा या मोसमातला हा लागोपाठ पाचवा पराभव आहे, यावेळी मुंबईला अजून एकही मॅच जिंकता आलेली नाही. पॉईंट्स टेबलमध्येही मुंबई शेवटच्या म्हणजेच 10व्या क्रमांकावर आहे.

First published:

Tags: Ipl 2022, Mumbai Indians, Suryakumar yadav