मुंबई, 25 एप्रिल : केएल राहुलच्या (KL Rahul) कॅप्टनसीमध्ये खेळणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्सनं (Lucknow Super Giants) आयपीएल 2022 मधील पाचवा विजय मिळवला आहे. लखनऊनं रविवारी झालेल्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) 36 रननं पराभव केला. या विजयानंतर मुंबई विरूद्ध खेळलेल्या लखनऊच्या संपूर्ण टीमवर दंडात्मक कारवाई झाली आहे. लखनऊच्या प्लेईंग 11 मधील सर्व सदस्यांवर 6 लाख रूपये किंवा मॅच फिसमधील 25 टक्के रक्कम यामधील जे कमी असेल तितकी रक्कम कापून घेण्यात येणार आहे. तर कॅप्टन राहुलला दुप्पट दंड बसला आहे.
यापूर्वी मुंबई इंडियन्स विरूद्धच झालेल्या स्पर्धेतील 26 व्या सामन्यांत राहुलवर स्लो ओव्हर रेटमुळे 12 लाखांचा दंड आकारण्यात आला होता. त्यानंतर लखनऊनं दुसऱ्यांदा ही चूक केलीय. त्यामुळे राहुलला 24 लाखांचा दंड आकारण्यात आला. आला. आयपीएलच्या नियमानुसार 85 व्या मिनिटाला 20 वी ओव्हर सुरू होणं बंधनकारक आहे. लखनऊकडून आणखी एकदा ही चूक झाल्यास राहुलवर एका मॅचसाठी निलंबनाची कारवाई केली जाईल. यापूर्वी आरसीबी विरूद्ध झालेल्या मॅचमध्येही आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल राहुलवर मॅच फिसमधील 20 टक्के रक्कम कापून घेण्यात आली होती.
लखनऊ सुपर जाएंट्सने दिलेलं 169 रनचं आव्हान पार करण्यासाठी आलेल्या मुंबईला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 132 रनच करता आल्या, त्यामुळे त्यांचा 36 रनने पराभव झाला. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर केएल राहुलच्या खणखणीत शतकाच्या जोरावर लखनऊनं 6 आऊट 168 पर्यंत मजल मारली.
IPL 2022: 'इशान किशन पैशांमुळे बॅटींग विसरला', मुंबईच्या माजी कॅप्टनचा गंभीर आरोप
लखनऊविरुद्धच्या या पराभवासोबतच मुंबईचं प्ले-ऑफला पोहोचण्याची अखेरची आशाही मावळली आहे. आता कोणता चमत्कारही मुंबईला प्ले-ऑफमध्ये घेऊन जाऊ शकणार नाही. या मोसमातल्या सगळ्या 8 मॅचमध्ये मुंबईचा पराभव झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.