मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : इशान किशनला होणार शिक्षा! 'त्या' कृतीचा VIDEO VIRAL

IPL 2022 : इशान किशनला होणार शिक्षा! 'त्या' कृतीचा VIDEO VIRAL

इशानकडून (Ishan Kishan) मुंबईला मोठ्या खेळीची अपेक्षा होती. त्यानं 17 बॉलमध्ये फक्त 13 रन केले. मुंबईच्या इनिंगमधील 7 व्या ओव्हरमध्ये मार्कस स्टॉईनिसच्या बॉलिंगवर इशान आऊट झाला.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 17 एप्रिल : मुंबई इंडियन्सचा विकेट किपर इशान किशन (Ishan Kishna) सध्या खराब काळातून जात आहे. इशानला मुंबई इंडियन्सनं तब्बल 15 कोटी 25 लाखांना खरेदी केले होते. त्यानं आयपीएल सिझनची सुरूवात चांगली केली. दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध पहिल्या मॅचमध्ये नाबाद 81 रन काढले. त्यानंतर राजस्थान रॉयल्स विरूद्ध 54 रनची खेळी केली. या दोन अर्धशतकानंतर इशानची गाडी घसरली.

इशानला त्यानंतरच्या पुढील 4 मॅचमध्ये 26 पेक्षा जास्त रन करता आले नाहीत. त्याची निराशा लखनऊ सुपर जायंट्स विरूद्धच्या मॅचमध्ये स्पष्ट दिसली. मुंबईला ही मॅच  जिंकण्यासाठी 200 रनची गरज होती. या धावसंख्येचा पाठलाग करताना इशान स्वस्तात आऊट झाला.

इशानकडून मुंबईला मोठ्या खेळीची अपेक्षा होती. त्यानं 17 बॉलमध्ये फक्त 13 रन केले. मुंबईच्या इनिंगमधील 7 व्या ओव्हरमध्ये मार्कस स्टॉईनिसच्या बॉलिंगवर इशान आऊट झाला. त्यानं आऊट झाल्याचा राग पॅव्हिलियनमध्ये परत जाताना बाऊंड्रीवर काढला.

इशाननं बाऊंड्रीवर बॅट मारली. बाऊंड्रीवर स्पॉनर्सची नावं छापलेली असतात. इशानची ही कृती आचार संहिता भंग करणारी ठरू शकते. तसं झालं तर त्याच्यावर दंडात्मक करवाई करण्यात येईल. इशाननं या आयपीएलमधील 6 इनिंगमध्ये 38.20 च्या सरासरीनं 191 रन केले आहेत. यामध्ये त्याचा स्ट्राईक रेट 117.17 आहे.

IPL 2022 : 'टीम इंडियात परत येण्यासाठी...', जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या कार्तिकची मोठी प्रतिक्रिया

200 रनचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सनं निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 9 आऊट 181 रन केले. मुंबईकडून सूर्यकुमार यादवनं सर्वाधिक 37 रन केले. तर डेवाल्ड ब्रेविसनं 31 रन काढले. कायरन पोलार्डनं शेवटच्या ओव्हर्समध्ये 14 बॉलमध्ये 25 रनची खेळी करत मुंबईच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. पण, पोलार्डलाही निर्णायक विजय मिळवून देण्यात अपयश आले. मुंबई इंडियन्सचा हा सलग सहावा पराभव असून पाच वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या रोहित शर्माच्या टीमवर पहिल्यांदा ही नामुश्की आली आहे.

First published:

Tags: Ipl 2022, Ishan kishan, Lucknow Super Giants, Mumbai Indians