जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : 'टीम इंडियात परत येण्यासाठी...', जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या कार्तिकची मोठी प्रतिक्रिया

IPL 2022 : 'टीम इंडियात परत येण्यासाठी...', जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या कार्तिकची मोठी प्रतिक्रिया

IPL 2022 : 'टीम इंडियात परत येण्यासाठी...', जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या कार्तिकची मोठी प्रतिक्रिया

दिनेश कार्तिकचा (Dinesh Karthik) स्पर्धेतील फॉर्म पाहाता त्याचा आगामी टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियामध्ये समावेश करण्याची मागणी करण्यात येत आहे. दिल्ली विरूद्धच्या मॅचनंतर कार्तिकनं या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 17 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) आरसीबीचा विकेट किपर दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. रविवारी झालेल्या स्पर्धेतील 27 व्या मॅचमध्ये कार्तिकनं  34 बॉलमध्ये नाबाद 66 रन काढले. कार्तिकच्या या खेळीमुळे आरसीबीनं दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) 16 रननं पराभव केला. कार्तिकचा स्पर्धेतील फॉर्म पाहाता त्याचा आगामी टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियामध्ये समावेश करण्याची मागणी करण्यात येत आहे. दिल्ली विरूद्धच्या मॅचनंतर कार्तिकनं या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे. कार्तिक या प्रश्नावर बोलताना म्हणाला, ‘मी मोठं लक्ष्य निश्चित केलं आहे. ते साध्य करण्यासाठी कठोर मेहनत घेत आहे. देशासाठी काही तरी मोठं करण्याचं माझं लक्ष्य आहे. हे सर्व त्या प्रवासाचा भाग आहे. मला टीम इंडियात पुन्हा जागा मिळवायची आहे. त्यासाठी मी सर्वस्व पणाला लावण्यास तयार आहे.’ कार्तिकची 192 सरासरी दिनेश कार्तिक आयपीएलच्या या मोसमातला आरसीबीचा सर्वाधिक रन करणारा खेळाडू आहे. 6 मॅचच्या 6 इनिंगमध्ये कार्तिकने 192 ची सरासरी आणि 208.69 च्या स्ट्राईक रेटने 192 रन केले आहेत, यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे. 6 इनिंगमध्ये कार्तिक 5 वेळा नाबाद राहिला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये टीम इंडियानं विकेट किपर म्हणून ऋषभ (Rishabh Pant) आणि इशान किशन (Ishan Kishan) यांना संधी दिली आहे. पंत आणि इशान दोघांसाठीही हा आयपीएल सिझन अद्याप खास ठरलेला नाही. पंतनं पहिल्या 5 मॅचच्या 4 इनिंगमध्ये पंतने 36.67 च्या सरासरीने आणि 135.80 च्या स्ट्राईक रेटने 110 रन केले आहेत. विराट कोहलीनं एका हातानं कॅच घेताच अनुष्कानं मारली उडी, सासू-सासऱ्यांनीही वाजवल्या टाळ्या, पाहा VIDEO मुंबईने 15.25 कोटी रुपये घेऊन विकत घेतलेल्या इशान किशनने पहिल्या दोन सामन्यांमध्ये अर्धशतकं केली, पण त्यानंतर इशानची कामगिरी निराशाजनक झाली आहे. 6 मॅचमध्ये 38.20 ची सरासरी आणि 117.17 च्या स्ट्राईक रेटने त्याने 191 रन केले आहेत. टीम इंडियाचे इतर विकेट कीपर अपयशी ठरत असल्यामुळे 36 वर्षांचा दिनेश कार्तिक टीम इंडियात कमबॅक करणार का? हे पाहावं लागेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात