जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : ....मैदानात असतो तर, KKR च्या विजयानंतर आनंदी शाहरूखची पोस्ट Viral

IPL 2022 : ....मैदानात असतो तर, KKR च्या विजयानंतर आनंदी शाहरूखची पोस्ट Viral

IPL 2022 : ....मैदानात असतो तर, KKR च्या विजयानंतर आनंदी शाहरूखची पोस्ट Viral

KKR vs MI: पॅट कमिन्सच्या (Pat Cummins) वादळी खेळीमुळे कोलकाता नाईट रायडर्सनं मुंबई इंडियन्सचा 24 बॉल आणि 5 विकेट्सनं मोठा पराभव केला. केकेआरचा मालक शाहरूख खान (Shah Rukh Khan) या विजयानं चांगलाच आनंदी झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 7 एप्रिल : पॅट कमिन्सच्या (Pat Cummins) वादळी खेळीमुळे कोलकाता नाईट रायडर्सनं (Kolkata Knight Riders) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) 24 बॉल आणि 5 विकेट्सनं मोठा पराभव केला आहे. पॅट कमिन्सनं (Pat Cummins) 15 बॉलमध्ये नाबाद 56 रनची वादळी खेळी केली. त्यानं फक्त 14 बॉलमध्ये अर्धशतक करत आयपीएल रेकॉर्डची बरोबरी केली. यापूर्वी पहिल्यांदा बॅटींगसाठी आलेल्या मुंबई इंडियन्सला सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), तिलक वर्मा (Tilak Varma) आणि कायरन पोलार्ड (Kieron Pollard) यांनी केलेल्या धमाक्यामुळे निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 4 आऊट 161 पर्यंत मजल मारता आली. मुंबईच्या बॉलर्सनी 15 ओव्हरपर्यंत मॅचवर वर्चस्व ठेवलं होते. पण, डॅनियल सॅम्सनं टाकलेल्या 16 व्या ओव्हरमध्ये कमिन्सनं 35 रन करत केकेआरच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. केकेआरचा मालक आणि अभिनेता शाहरूख खान (Shah Rukh Khan) या विजयानं चांगलाच आनंदी झाला आहे. केकेआरच्या विजयावरील त्याची इन्स्टाग्राम पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. ‘वॉव, अगेन केकेआर बॉयज, पॅट कमिन्स आणि आंद्रे रसेलप्रमाणे डान्स करण्याची इच्छा आहे. त्यांची गळाभेट घेण्याची इच्छा आहे. टीमनं खूप चांगला खेळ केला. काय बोलू… पॅट दिए छक्के.’ अशी पोस्ट शाहरूखनं केली आहे.

जाहिरात

केकेआरचा चार सामन्यांमधील हा तिसरा विजय आहे. या विजयासह त्यांनी राजस्थान रॉयल्सला (Rajasthan Royals) पहिल्या क्रमांकावरून हटवलं आहे. तर सलग तिसरा पराभव झाल्यानंचर मुंबई इंडियन्सची टीम पॉईंट टेबलमध्ये चेन्नई सुपर किंग्सच्याही खाली घसरली आहे. रोहित शर्माची टीम सध्या नवव्या क्रमांकावर असून त्यांचा नेट रनरेट देखील खराब झाला आहे. स्वस्तात मस्त! 5 नवोदीत भारतीय खेळाडूंचा IPL 2022 मध्ये धमाका, मुंबईच्या एका खेळाडूचाही समावेश  कोलकाता नाईट रायडर्सची पुढील मॅच रविवारी दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध होणार आहे. तर मुंबई इंडियन्सचा शनिवारी रॉयल चॅलेंजर्सचा सामना करायचा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात