जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022, MI vs KKR : बुमराहसह एका भारतीय खेळाडूवर कारवाई, BCCI नं सुनावली 'ही' शिक्षा

IPL 2022, MI vs KKR : बुमराहसह एका भारतीय खेळाडूवर कारवाई, BCCI नं सुनावली 'ही' शिक्षा

IPL 2022, MI vs KKR : बुमराहसह एका भारतीय खेळाडूवर कारवाई, BCCI नं सुनावली 'ही' शिक्षा

कोलकाता नाईट रायडर्सनं बुधवारी झालेल्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा (KKR vs MI) 5 विकेट्सनं पराभव केला. या मॅचमध्ये खेळलेल्या दोन खेळाडूंवर बीसीसीआयनं (BCCI) कारवाई केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 7 एप्रिल : कोलकाता नाईट रायडर्सनं बुधवारी झालेल्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा (KKR vs MI) 5 विकेट्सनं पराभव केला.  या मॅचमध्ये खेळलेल्या दोन खेळाडूंवर बीसीसीआयनं (BCCI) कारवाई केली आहे. टीम इंडिया आणि मुंबई इंडियन्सचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि कोलकाता नाईट रायडर्सचा भारतीय बॅटर नितिश राणा (Nitish Rana) यांच्यावर आयपीएल स्पर्धेची आचारसंहिता भंग केल्या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे. बुमराह आणि नितिश यांनी कोणत्या नियमांचा उल्लंघन केला आहे, याचा खुलसा अद्याप करण्यात आली नाही. या प्रकरणात नितिश राणावर लेव्हल 1 नुसार कारवाई करण्यात आली असून त्याच्या मॅच फिसमधील 10 टक्के रक्कम कापण्यात आली आहे. जसप्रीत बुमराहावर कोणताही आर्थिक दंड आकारण्यात आलेला नाही, पण त्याला समज देण्यात आली आहे. बुमराहनं चूक मान्य केल्याचं बीसीसीआयनं स्पष्ट केलं आहे. बुधवारी झालेल्या मॅचमध्ये पॅट कमिन्सच्या (Pat Cummins) या वादळी खेळीमुळे केकेआरने मुंबईचं 162 रनचं आव्हान 16 ओव्हरमध्येच पार केलं. केकेआरला शेवटच्या 5 ओव्हरमध्ये विजयासाठी 35 रनची गरज होती, पण डॅनियल सॅम्सने एकाच ओव्हरमध्ये 35 रन दिले. सॅम्सच्या 16 व्या ओव्हरमध्ये कमिन्सने 4 सिक्स आणि 2 फोर मारल्या, याचसोबत त्याने एक नो बॉलही टाकला. कमिन्सने तब्बल 373.33 च्या स्ट्राईक रेटने रन काढल्या. सॅम्सने 3 ओव्हरमध्ये 50 रन दिले, त्याला एक विकेट घेण्यात यश आलं. याशिवाय मिल्स आणि मुरुगन अश्विन यांनी 2-2 विकेट घेतल्या. कमिन्सशिवाय व्यंकटेश अय्यरने 41 बॉलमध्ये नाबाद 50 रनची खेळी केली. आयपीएल इतिहासतल्या सगळ्यात जलद अर्धशतकाच्या विक्रमाची पॅट कमिन्सने बरोबरी केली. केएल राहुल यानेही 14 बॉलमध्येच अर्धशतक केलं होतं. कमिन्स 15 बॉलमध्ये 56 रनवर नाबाद राहिला, त्याच्या या तडाखेबंद खेळीमध्ये 6 सिक्स आणि 4 फोरचा समावेश होता. IPL 2022 : ….मैदानात असतो तर, KKR च्या विजयानंतर आनंदी शाहरूखची पोस्ट Viral केकेआरचा चार सामन्यांमधील हा तिसरा विजय आहे. या विजयासह त्यांनी राजस्थान रॉयल्सला (Rajasthan Royals) पहिल्या क्रमांकावरून हटवलं आहे. तर सलग तिसरा पराभव झाल्यानंचर मुंबई इंडियन्सची टीम पॉईंट टेबलमध्ये चेन्नई सुपर किंग्सच्याही खाली घसरली आहे. रोहित शर्माची टीम सध्या नवव्या क्रमांकावर असून त्यांचा नेट रनरेट देखील खराब झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात