मुंबई, 7 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) गुजरात टायटन्सनं (Gujarat Titans) पहिल्यांदाच सलग दोन सामने गमावले आहेत. ब्रेबॉर्न स्टेडिअमवर शुक्रवारी झालेल्या सामन्यात (MI vs GT) मुंबई इंडियन्सनं त्यांचा 5 रननं निसटता पराभव केला. या पराभवामुळे ‘प्ले ऑफ’ मधील जागा निश्चित करण्याचं गुजरातचं ध्येय आणखी लांबणीवर पडलं आहे. अर्थात यासाठी गुजरातच्या खेळाडूंनी निर्णयाक क्षणी केलेल्या दोन चुका कारणीभूत ठरल्या आहेत. त्यामधील पहिली चूक तर कॅप्टन हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) केली. मुंबई इंडियन्सनं दिलेल्या 178 रनचा पाठलाग करताना गुजरातनं दमदार सुरूवात केली होती. शुभमन गिल आणि वृद्धीमान साहा या ओपनिंग जोडीनं 106 रनची भागिदारी केली. गिल आणि साहा या दोघांनीही अर्धशतक झळकावली.18 व्या ओव्हरपर्यंत मॅचवर गुजरातचं वर्चस्व होतं. हार्दिक ठरला गुन्हेगार मुंबई इंडियन्सकडून रिले मेरिडेथनं 18 वी ओव्हर टाकली. या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर हार्दिकनं फोर लगावला. त्यानंतर पुढच्या दोन बॉलवर तीन रन निघाले. निम्मी ओव्हर गुजरातच्या मनासारखी झाली. त्यानंतर चौथ्या बॉलवर मिलरनं कट लगावला आणि एक रनसाठी हार्दिकला कॉल दिला. नॉन स्ट्रायकर एंडचा हार्दिक क्रिझमध्ये पोहचेपर्यंत इशान किशननं त्याला रन आऊट केलं होतं. हार्दिकनं यावेळी डाईव्ह मारण्याचा प्रयत्नच केला नाही. त्याला या चुकीचा फटका बसला. हार्दिक गुजरातचा सर्वात प्रमुख बॅटर आहे. तो आऊट झाल्यानं मुंबईला मॅचमध्ये परतण्याची संधी मिळाली. हार्दिक पांड्या आऊट झाल्यानंतरही गुजरातला विजयाची संधी होती. पण, राहुल तेवातियानं शेवटच्या ओव्हरमध्ये हार्दिकसारखीच चूक केली. शेवटच्या ओव्हरमध्ये गुजरातला विजयासाठी 9 रन हवे होते. डेव्हिड मिलर आणि तेवातिया मैदानात असल्यानं गुजरातसाठी हे सोपं आव्हान होतं. या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर राहुल तेवातिया रन आऊट झाला. एक रन काढल्यानंतर दुसऱ्या रनसाठी हळू पळणं त्याला महागात गेलं. तिलक वर्मानं अचूक थ्रो करत त्याला परत पाठवलं. टीम इंडिया इंग्लंडनंतर करणार वेस्ट इंडिज-अमेरिका दौरा, वाचा संपूर्ण वेळापत्रक राहुल तेवातिया आऊट झाल्यानंतर मुंबई इंडियन्सचा आत्मविश्वास वाढला. डॅनियल सॅम्सनं शेवटच्या तीन बॉलमध्ये फक्त 1 रन देत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.