मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL Auction मध्ये पहिल्यांदाच दिसली Suhana Khan, Aryan सह लावणार खेळाडूंवर लावणार बोली

IPL Auction मध्ये पहिल्यांदाच दिसली Suhana Khan, Aryan सह लावणार खेळाडूंवर लावणार बोली

IPL Auction: आयपीएल मेगा ऑक्शनची 2022 (IPL Auction 2022) तयारी आता पूर्ण झाली आहे. आज आणि उद्या (शनिवार, रविवार) बंगळुरूमध्ये हे ऑक्शन होणार आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 12 फेब्रुवारी: आयपीएल मेगा ऑक्शनची 2022 (IPL Auction 2022) तयारी आता पूर्ण झाली आहे. आज आणि उद्या (शनिवार, रविवार) बंगळुरूमध्ये हे ऑक्शन होणार आहे. या ऑक्शनच्यापूर्वी सर्व टीमना या ऑक्शनच्या नियमांची माहिती देण्यात आली. त्यावेळी कोलकाता नाईट रायडर्सकडून (Kolkata Knight Riders) बॉलिवूड स्टार शाहरूख खानची (Shah Rukh Khan) मुलगी सुहाना खान (Suhana Khan) दिसली. सुहानासोबत तिचा भाऊ आर्यन खान (Aryan Khan) देखील उपस्थित होता. सुहाना पहिल्यांदाच या ऑक्शनमध्ये सहभागी होणार आहे.

आर्यननं यावेळी पांढरा शर्ट घातला होता. तर सुहानानं कोरनापासून बाचव करण्यासाठी केकेआरचा मास्क घातला होता. या दोघांचा फोटो सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे.

सुहाना आयपीएल ऑक्शनमध्ये पहिल्यांदा सहभागी होत आहे. पण, आर्यन यापूर्वी देखील यामध्ये सहभागी झाला होता. मागीलवर्षी झालेल्या ऑक्शनमध्ये आर्यन केकेआरची सहमालक जूही चावलाची मुलगी जानव्ही मेहतासोबत दिसला होता. त्याेळी जूही चावलानं या दोघांचा एकत्र फोटो देखील शेअर केला होता.

IPL Auction 2022 : शेवटच्या क्षणी ट्विस्ट, टीम इंडियाच्या ऑल राऊंडरची वाढली किंमत

कोलकाता नाईट रायडर्सनं यापूर्वी दोन वेळा आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद पटकावले होते. आयपीएल 2021 मध्ये (IPL 2021)  त्यांनी फायनलमध्ये धडक मारली होती. फायनलमध्ये त्यांचा चेन्नई सुपर किंग्सनं (Chennai Super Kings) पराभव केला होता. या आयपीएलपूर्वी त्यांनी आंद्रे रसेल, सुनील नरीन, वरूण चक्रवर्ती आणि व्यंकटेश अय्यर या चार जणांना रिटेन केले आहे.

First published:

Tags: Csk, Ipl 2022, Ipl 2022 auction, KKR, Shah Rukh Khan, Suhana khan