मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL Auction 2022: शेवटच्या क्षणी twist, टीम इंडियाच्या ऑल राऊंडरची वाढली किंमत

IPL Auction 2022: शेवटच्या क्षणी twist, टीम इंडियाच्या ऑल राऊंडरची वाढली किंमत

IPL Auction 2022: आयपीएल 2022 स्पर्धेचे मेगा ऑक्शन (IPL 2022 Mega Auction) आज आणि उद्या (शनिवार आणि रविवार) होत आहे. हे ऑक्शन सुरू होण्याच्या काही तास आधी टीम इंडियाच्या ऑल राऊंडरची बेस प्राईज वाढली आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 12 फेब्रुवारी: आयपीएल 2022 स्पर्धेचे मेगा ऑक्शन (IPL 2022 Mega Auction) आज आणि उद्या (शनिवार आणि रविवार) होत आहे. यंदा होणाऱ्या मेगा ऑक्शनमध्ये एकूण 600 खेळाडूंवर बोली लागणार आहे. आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या 10 टीम या खेळाडूंवर बोली लावतील. या ऑक्शनची तयारी आता पूर्ण झाली आहे. ऑक्शन सुरू होण्याच्या काही तास आधी टीम इंडियाचा ऑल राऊंडर दीपक हुड्डाची (Deepak Hooda) बेस प्राईज वाढली आहे.

भारत विरूद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातील नुकत्याच झालेल्या वन-डे सीरिजमध्ये हुड्डानं टीम इंडियात पदार्पण केले. या सीरिजमधील 2 मॅचमध्ये त्याने 55 रन केले. तसंच 6 च्या इकोनॉमी रेटनं 1 विकेटही घेतली आहे. हुड्डाची बेस प्राईज यापूर्वी 40 लाख इतकी होती. ती त्याने 75 लाख केली आहे.  टीम इंडियाकडून पदार्पण केल्यानं फायदा होईल अशी त्याला अपेक्षा आहे.

दीपक हुड्डा यापूर्वी पंजाब किंग्ज (Punjab Kings) टीमचा सदस्य होता. त्याचबरोबर तो सनरायझर्स हैदराबाद टीमकडूनही खेळला आहे. त्याने आयपीएल कारकिर्दीमध्ये 80 मॅच खेळल्या असून यामध्ये 129.54 च्या स्ट्राईक रेटनं 785 रन केले आहेत. हुड्डानं आयपीएलमध्ये आजवर 3 अर्धशतक झळकावली आहेत. तर बॉलिंगमध्ये त्यानं 8.46 च्या इकोनॉमी रेटनं 9 विकेट्स घेतल्या आहेत.

IPL Auction 2022 : राजस्थान रॉयल्स लिलावासाठी सज्ज, संजूनं सांगितला टीमचा प्लॅन

10 नव्या खेळाडूंचा समावेश

बीसीसीआयनं मेगा ऑक्शनपूर्वी 10 नव्या खेळाडूंचा यादीमध्ये समावेश केला आहे. या खेळाडूंमध्ये अग्निवेश अयाची, हार्दिक तमोर, नीतिश कुमार रेड्डी, मिहीर हिरवाणी, मोनू कुमार, रोहन राणा आणि साईराज पाटिल या 7 भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.त्याचबरोबर एरोन हार्डी, लॉन्स मॉरीस आणि निवेथन राधाकृष्णन या तीन ऑस्ट्रेलियन खेळाडूंचाही यादीमध्ये शेवटच्या क्षणी समावेश करण्यात आला आहे. 'क्रिकबझ'ने दिलेल्या वृत्तानुसार  यापूर्वी ऑक्शनच्या नियमांची पूर्तता करू न शकल्याने त्यांची निवड करण्यात आली नव्हती.. मात्र बीसीसीआयनं शेवटच्या क्षणी विशेष अधिकारांचा वापर करत त्यांचा समावेश केला आहे.

First published:

Tags: Cricket news, India, Ipl 2022, Ipl 2022 auction, Punjab kings, West indies