मुंबई, 18 डिसेंबर : आयपीएल 2022 मध्ये (IPL2022) 2 नव्या टीम सहभागी होणार आहेत. बीसीसीआयनं (BCCI) या दोन नव्या टीमचे ऑक्शन केले होते. त्यापैकी अहमदाबाद टीमला अद्याप बोर्डाकडून मान्यता मिळालेली नाही. तर लखनऊ टीमची तयारी जोरदार सुरू आहे. या टीमनं हेड कोचची नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर कॅप्टनचं नाव देखील निश्चित केले आहे. आयपीएलमधील 8 जुन्या टीमनी एकूण 27 खेळाडूंना ऑक्शनपूर्वी रिटेन केले आहे. तर दोन नव्या टीमना कमाल 3 खेळाडूंना मेगा ऑक्शनपूर्वी करारबद्ध करता येणार आहे.
लखनऊ टीमनं झिम्बाब्वेचा माजी कॅप्टन अँडी फ्लॉवरची (Andy Flower) हेड कोच म्हणून नियुक्ती केली आहे. ते यापूर्वी पंजाब किंग्ज (Punjab Kings) टीमचे असिस्टंट कोच होते. 'इनसाईड स्पोर्ट्स' नं दिलेल्या वृत्तानुसार लखनऊनं केएल राहुलचं (KL Rahul) नाव कॅप्टन म्हणून नक्की केले आहे. याची अद्याप अधिकृत घोषणा बाकी आहे. बीसीसीआयनं यापूर्वी राहुलला टी20 टीमचा व्हाईस कॅप्टन म्हणून नियुक्त केले आहे.
दोन्ही टीमचे 6 खेळाडू ठरले
दोन्ही नव्या टीमना 25 डिसेंबरपर्यंत खेळाडूंच्या नावांची घोषणा करायची आहे, यानंतर पुढच्या महिन्यात खेळाडूंचा लिलाव (IPL Auction 2022) होणार आहे. अहमदाबाद आणि लखनऊ या दोन नव्या टीमनी त्यांचे प्रत्येकी 3-3 असे 6 खेळाडू निश्चित केल्याचं वृत्त आहे. पंजाब किंग्सची (Punjab Kings) साथ सोडलेला केएल राहुल (KL Rahul) लखनऊ टीमचं नेतृत्व करणार आहे, तर राशिद खान (Rashid Khan) आणि इशान किशनदेखील (Ishan Kishan) लखनऊच्या टीमचा भाग असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
Womens IPL कधी सुरू होणार? सौरव गांगुलीने केला मोठा खुलासा
दुसरीकडे अहमदाबादची टीम श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) कर्णधार होणार असल्याचंही सांगितलं जात आहे. श्रेयस अय्यरने दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) टीमकडून माघार घेतली होती. श्रेयस अय्यरशिवाय हार्दिक पांड्यालाही (Hardik Pandya) अहमदाबादने निवडलं आहे. तसंच तिसऱ्या खेळाडूसाठी डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि क्विंटन डिकॉक (Quinton De Kock) यांच्यापैकी एकाला अहमदाबादची टीम पसंती देऊ शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ipl 2022, Ipl 2022 auction, Kl rahul