मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Womens IPL कधी सुरू होणार? सौरव गांगुलीने केला मोठा खुलासा

Womens IPL कधी सुरू होणार? सौरव गांगुलीने केला मोठा खुलासा

भारतामध्ये महिला आयपीएल (Womens IPL) सुरू करण्यात यावे अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी याबाबतचा मोठा खुलासा केला आहे.

भारतामध्ये महिला आयपीएल (Womens IPL) सुरू करण्यात यावे अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी याबाबतचा मोठा खुलासा केला आहे.

भारतामध्ये महिला आयपीएल (Womens IPL) सुरू करण्यात यावे अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी याबाबतचा मोठा खुलासा केला आहे.

मुंबई, 18 डिसेंबर : इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेमुळे भारतीय क्रिकेटचे स्वरूप बदलले आहे. गेल्या 13 वर्षांमध्ये ही क्रिकेट विश्वातील सर्वात टफ टी20 लीग बनली आहे. पुरूष क्रिकेटपटूंना आयपीएल स्पर्धेचा मोठा फायदा झाला आहेय. पण, अद्यापही महिला क्रिकेटपटू या फायद्यापासून वंचित आहेत. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये महिलांच्या या प्रकारच्या स्पर्धा होतात. भारतामध्येही महिला आयपीएल (Womens IPL) सुरू करण्यात यावे अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी या स्पर्धेबाबत मोठा खुलासा केला आहे. क्रीडा पत्रकार बोरिया मजूमदार यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये गांगुली यांनी महिला आयपीएलबाबतच्या तयारीची माहिती दिली. 'महिला आयपीएल स्पर्धा लवकरच सुरू होईल. भारतीय क्रिकेट बोर्डानं याचा ड्राफ्ट तयार करण्यास सुरुवात केली आहे. येत्या तीन ते चार महिन्यांत या स्पर्धेबाबतची आमची योजना काय आहे, हे स्पष्ट होईल,' असे गांगुली यांनी सांगितले आहे.

नुकत्याच झालेल्या बिग बॅश लीग (Big Bash League) स्पर्धेत भारतीय महिला टी20 टीमची कॅप्टन हरमनप्रीत कौरनं (Harmanpreet Kaur) 'प्लेयर ऑफ द टुर्नामेंट' पुरस्कार पटकावला आहे. हरमनप्रीतने बिग बॅशमध्ये 406 रन काढले. त्याचबरोबर 15 विकेट्स देखील घेतल्या.

गांगुलींनी याबाबत बोलताना सांगितले की, 'मी हरमनप्रीतच्या बिग बॅश लीग स्पर्धेत खेळावर जाम खूश आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात खेळणे तिच्यासाठी थोडे अवघड होते. मी काही वर्षांपूर्वी वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धची तिची 171 रनची खेळी पाहिली होती. एका तरूण क्रिकेटसाठी जगातील बलाढ्य महिला टीमविरुद्ध 171 रन काढणे ही असामान्य गोष्ट आहे. हरमन, स्मृती, शफाली, मिताली आणि झुलन गोस्वामी या सर्व टीम इंडियाच्या शक्ती आहेत.'

टीम इंडियापासून दूर रोहित शर्मा बनला 'गुरू', शेअर केला चॅम्पियन होण्याचा मंत्र

हरमनप्रीतनं देखील बिग बॅश स्पर्धेतनंतर 'क्रिकइन्फो' शी बोलताना महिला आयपीएल स्पर्धेच्या मागणीला पाठिंबा दिला होता. 'माझ्या मते आता लवकरच महिला आयपीएल स्पर्धा सुरू होईल. आम्ही त्यामध्ये विदेशी खेळाडूंना बोलवू. त्यांच्या अनुभवाचा देशातील तरूण क्रिकेटर्सना फायदा होईल. ' असे मत हरमननं व्यक्त केले होते.

First published:

Tags: BCCI, Cricket news, Ipl, Sourav ganguly