मुंबई, 7 एप्रिल : लखनऊ सुपर जायंट्स (Luknow Super Giants) टीममधील ऑल राऊंडर कृणाल पांड्या (Krunal Pandya) आणि दीपक हुड्डा (Deepak Hooda) यांच्यात गेल्यावर्षी भांडण झाले होते. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत झालेलं हे भांडण इतकं तीव्र होतं की दीपक हुड्डानं बडोद्याची टीमच सोडली. हुड्डा आता राजस्थानकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. त्यामुळे लखनऊनं या दोन्ही खेळाडूंना खरेदी केलं त्यावेळी ते एकत्र कसं खेळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. ‘मैदानावर चांगली कामगिरी करण्यासाठी घट्ट मैत्री असणे आवश्यक नाही. ते व्यावसायिक खेळाडू आहेत. त्यांना त्यांचं काम माहिती आहे.’ या शब्दात लखनऊ टीमचा मेंटॉर गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने या वादावर आयपीएल स्पर्धा सुरू होण्यापूर्वी मत व्यक्त केले होते. आता आयपीएल स्पर्धा सुरू झाल्यानंतर दीपक हुड्डाचा कृणाल पांड्याबाबतचा सूर मैत्रीचा झाला आहे. हुड्डानं ‘दैनिक जागरण’ ला नुकतीच मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्यानं कृणाल पांड्याबाबतच्या संबंधांवर मत व्यक्त केलं आहे. ‘तो माझा भाऊ आहे. भावांंमध्ये भांडणं होत असतात. आता आम्ही एकाच टीममध्ये आहोत. आम्ही एकाच उद्देशानं खेळत आहोत.’ असं सांगत दीपकनं कृणालबरोबरचे भांडण मिटल्याचे संकेत दिले आहेत. आयपीएल 2022 मध्ये आत्तापर्यंत लखनऊ सुपर जायंट्सनं समाधानकारक कामगिरी केली आहे. त्यांनी तीन पैकी 2 मॅचमध्ये विजय मिळवला असून 1 मॅच गमावली आहे. IPL 2022 : अजिंक्यनं कॅच सोडताच श्रेयस अय्यरचा राग अनावर, पाहा VIDEO काय झाला होता वाद? मागच्या वर्षी जानेवारी महिन्यात सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीमध्ये (Sayed Mushtaq Ali Trophy) बडोद्याच्या पहिल्या सामन्याआधी दीपक हुड्डाचं कर्णधार कृणाल पांड्यासोबत (Krunal Pandya) भांडण झालं. यानंतर दीपक हुड्डा बायो-बबल सोडून निघून गेला. वादानंतर दीपक हुड्डाने बडोदा क्रिकेट असोसिएशनला पत्र लिहिलं आणि कर्णधार कृणाल पांड्यावर शिव्या दिल्याचे आणि करियर बरबाद केल्याचे आरोप केले. बडोदा क्रिकेट असोसिएशनने मात्र हुड्डावर शिस्तभंगाची कारवाई करत एका वर्षासाठी निलंबन केलं. बडोद्यानं निलंबन केल्यानंतर हुड्डानं राजस्थानकडून क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्याची वेस्ट इंडिज विरुद्धच्या सीरिजमध्ये निवड झाली होती. टीम इंडियाकडून समाधानकारक कामगिरी केलेल्या हुड्डाला लखनऊ सुपर जायंट्सनं (Lucknow Super Giants) 5 कोटी 75 लाखांना खरेदी केले. तर लखनऊने कृणाल पांड्यासाठी 8 कोटी 25 लाख रूपये मोजले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.