Home /News /sport /

IPL 2022, LSG vs RCB Dream 11: 'करो वा मरो' लढतीत, 'या' खेळाडूंचा करा टीममध्ये समावेश

IPL 2022, LSG vs RCB Dream 11: 'करो वा मरो' लढतीत, 'या' खेळाडूंचा करा टीममध्ये समावेश

या सामन्यात पराभूत होणाऱ्या टीमचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार असल्यानं लखनऊ आणि आरसीबीसाठी (LSG vs RCB) ही 'करो वा मरो' ची लढत आहे.

    मुंबई, 25 मे : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील एलिमेटनेटर लढत आज (गुरूवार) होणार आहे. लखनऊ सुपर जायंट्स विरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (LSG vs RCB) यांच्यात कोलकातामधी इडन गार्डन्सवर हा सामना होईल. या सामन्यात पराभूत होणाऱ्या टीमचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार असल्यानं लखनऊ आणि आरसीबीसाठी ही 'करो वा मरो' ची लढत आहे. विजयी टीमची लढत दुसऱ्या क्वालिफायरमध्ये राजस्थान रॉयल्सशी होईल. लखनऊ सुपर जायंट्सनं जोरदार कामगिरी करत 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश केला आहे, लखनऊनं 14 पैकी 9 सामने जिंकत तिसरा क्रमांक पटाकावला. तर आरसीबीनं 14 पैकी 8 सामने जिंकले आणि 6 गमावले. आरसीबीचा पॉईंट टेबलमध्ये चौथा क्रमांक होता. पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या टीममध्ये हा सामना होत आहे. लखनऊकडून कॅप्टन केएल राहुलनं (KL Rahul) सर्वात जास्त रन केले आहेत. त्यानं आत्तापर्यंत 14 सिझनमध्ये 537 रन केले आहेत. यामध्ये 2 शतक आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. 15 व्या सिझनमधील त्याचा सर्वोच्च स्कोर 103 आहे. आजच्या सामन्यातही त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. दुसरिकडं आरसीबीरकडून फाफ ड्यूप्लेसी (Faf du Plessis) यशस्वी ठरला आहे. आरसीबीच्या कॅप्टननं आत्तापर्यंत 14 सामन्यात 443 रन केले आहेत. यामध्ये 3 अर्धशतकांचा समावेश आहे. 96 हा त्याचा सर्वोच्च स्कोर आहे. IPL 2022 : मिलरनं मागितली राजस्थान रॉयल्सची माफी, मॅचनंतरही रंगली जुगलबंदी LSG vs RCB Dream 11 prediction कॅप्टन: केएल राहल व्हाईस कॅप्टन : फाफ डुप्लेसी विकेट किपर: क्विंटन डिकॉक बॅटर: दीपक हुड्डा, विराट कोहली, रजत पाटीदार ऑल राऊंडर : मार्कस स्टोइनिस, ग्लेन मॅक्सवेल बॉलर्स: आवेश खान, जोश हेजलवूड मोहसीन खान लखनऊ सुपर जायंट्स : केएल राहुल (कॅप्टन), मार्कस स्टोइनिस, रवि बिश्नोई, क्विंटन डिकॉक, एविन लुईस, मनीष पांडे, दीपक हुडा, मनन वोहरा, कृणाल पांड्या, जेसन होल्डर, आवेश खान, एंड्रयू टाय, अंकित राजपूत, कृष्णप्पा गौतम, दुष्मंता चमीरा, शाहबाज नदीम, मोहसीन खान, आयूष बदोनी, काइली मेयर्स, करण शर्मा. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर : फाफ डुप्लेसी (कॅप्टन), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, दिनेश कार्तिक, हर्षल पटेल, वानिंदू हसरंगा, सुयश प्रभुदेसाई, अनूज रावत, शाहबाज अहमद, आकाश दीप, अनीश्वर गौतम, जेसन बेहरनड्रॉफ, जोश हेजलवूड, एस. मिलिंद, महिपाल लोमरोर, शरफेन रदरफोर्ड, फिन एलेन, कर्ण शर्मा, डेव्हिड विली, रजत पाटीदार, सिद्धार्थ कौल.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ipl 2022, Lucknow Super Giants, RCB

    पुढील बातम्या