Home /News /sport /

IPL 2022 : 'आम्ही मुर्खासारखं खेळलो', लखनऊच्या विजयानंतरही राहुलचा राग अनावर

IPL 2022 : 'आम्ही मुर्खासारखं खेळलो', लखनऊच्या विजयानंतरही राहुलचा राग अनावर

लखनऊनं पहिल्यांदा बॅटींग करतना 8 आऊट 153 रन केले. पंजाबला हे टार्गेट पूर्ण करता आले नाही. लखनऊनं मॅच जिंकली असली तरी या विजयानंतर कॅप्टन केएल राहुलला (KL Rahul) टीमवरील नाराजी लपवता आली नाही.

    मुंबई, 30 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) शुक्रवारी झालेल्या एका लो स्कोरिंग मॅचमध्ये लखनऊ सुपर जायंट्सनं पंजाब किंग्जजा (LSG vs PBKS) 20 रननं पराभव केला. लखनऊनं पहिल्यांदा बॅटींग करतना 8 आऊट 153 रन केले. पंजाबला हे टार्गेट पूर्ण करता आले नाही. लखनऊनं मॅच जिंकली असली तरी या विजयानंतर कॅप्टन केएल राहुलला (KL Rahul) टीमवरील नाराजी लपवता आली नाही. या मॅचमध्ये पहिल्यांदा बॅटींग करताना लखनऊनं 13 ओव्हर्समध्ये 2 आऊट 99 रन केले होते. त्यावेळी लखनऊ मोठा स्कोअर करेल, अशी आशा होती. पण क्विंटन डी कॉक (46) रनवर आऊट होताच लखनऊची इनिंग गडगडली. त्यांनी नंतर 13 रनमध्येच चार विकेट्स गमावल्या. त्यामुळे लखनऊला फक्त 153 रन करता आले. त्यानंतर लखनऊच्या बॉलर्सनी दमदार कामगिरी करत पंजाब किंग्जला 133 रनवरच रोखले. राहुलनं मॅचनंतर बोलताना सांगितलं की, 'आम्ही बॅटींगमध्ये मुर्खासारखं खेळलो. आमची बॅटींग ऑर्डर अनुभवी आहे. आम्हाला याचा पूर्ण फायदा उठवायला पाहिजे होता. 10 ओव्हर्सनंतर क्विंटन डी कॉक आणि दीपक हुड्डा बॅटींग करत होते. त्यांनी इनिंग चांगली सावरली होती. या दोघांनी अवघड विकेटवर 9 ओव्हर्समध्ये 60 रनची भागिदारी केली होती. अन्य बॅटर्सनी विचारपूर्वक बॅटींग केली असती तर आम्ही आरामात 180-190 रन केले असते. मी टीमच्या बॅटींगवर नाराज आहे.' राहुलनं यावेळी बॉलर्सचं कौतुक केलं. 'माझ्या मते आम्ही खेळातील परिस्थिती नीट ओळखली पाहिजे. आमच्या बॅटर्सनी खूप शॉट्स मारले नसते तर आम्ही चांगला खेळ करू शकलो असतो. आम्ही चांगली फिल्डिंग आणि बॉलिंग केली. आता पुढच्या मॅचमध्येही याची पुनरावृत्ती होणे आवश्यक आहे. RCB vs GT, Dream 11 Team Predication : विराटला फॉर्म गवसणार? 'या' खेळाडूंची करा तुमच्या टीममध्ये निवड कृणाल पांड्यानं या संपूर्ण आयपीएल सिझनमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यानं अतिशय उपयुक्त बॉलिंग केलीय. त्याचबरोबर महत्त्वाच्या क्षणी विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर फास्ट बॉलर्सनं ज्या पद्धतीनं बॉलिंग केली त्याचा टीमला फायदा झाला,' असे राहुलने स्पष्ट केले.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ipl 2022, Kl rahul, Lucknow Super Giants, Punjab kings

    पुढील बातम्या