जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : लखनऊला 22 वर्षांच्या मुलानं मिळवून दिला धोनी स्टाईल विजय, प्रत्येक मॅचमध्ये करतोय कमाल

IPL 2022 : लखनऊला 22 वर्षांच्या मुलानं मिळवून दिला धोनी स्टाईल विजय, प्रत्येक मॅचमध्ये करतोय कमाल

IPL 2022 : लखनऊला 22 वर्षांच्या मुलानं मिळवून दिला धोनी स्टाईल विजय, प्रत्येक मॅचमध्ये करतोय कमाल

यापूर्वी सीएसकेविरूद्धही त्यानं विजयी रन केले होते. यामध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये मुकेश चौधरीला मारलेल्या सिक्सचा समावेश होता. शेवटच्या ओव्हरमध्ये सिक्स मारून मॅच संपवण्याच्या या पद्धतीमुळेही त्याची तुलना धोनीशी केली जात आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 8 एप्रिल : आयपीएल स्पर्धेतील नवी टीम असलेल्या लखनऊ सुपर जायंट्सनं (Lucknow Super Giants) विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण केली आहे. लखनऊनं गुरूवारी झालेल्या मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) 2 बॉल आणि 6 विकेट्सनं विजय मिळाला. रन करणे अवघड झालेल्या या पिचवर 22 वर्षांच्या आयुष बदोनीनं (Ayush Badoni) लखनऊला महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) स्टाईल म्हणजेच सिक्स मारत विजय मिळवून दिला. बदोनीचा हा पहिलाच आयपीएल सिझन आहे. त्यामध्ये त्यानं प्रत्येक मॅचमध्ये दमदार खेळी केली आहे. बदोनी शेवटच्या ओव्हरमध्ये बॅटींगला आला त्यावेळी लखनऊला जिंकण्यासाठी 5 बॉलमध्ये 5 रन हवे होते. त्यानंतर शार्दुल ठाकूरनं पहिल्या बॉलवर एकही रन दिला नाही. त्यामुळे मॅचमधील रंगत आणखी वाढली. त्या अवघड परिस्थितीमध्येही बदोनीनं कोणताही घाई केली नाही. त्यानं शेवटच्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलरवर फोर आणि चौथ्या बॉलवर सिक्स मारत टीमला विजय मिळवून दिला. बदोनी 3 बॉलमध्ये 10 रन करत नाबाद राहिला. बदोनी 4 पैकी 2 इनिंगमध्ये नाबाद राहिला आहे. त्या दोन्ही इनिंगमध्ये त्यानंच विजयी रन केले आहेत. यापूर्वी सीएसकेविरूद्धही त्यानं विजयी रन केले होते. यामध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये मुकेश चौधरीला मारलेल्या सिक्सचा समावेश होता. बदोनीच्या मॅच संपवण्याच्या या पद्धतीनंही त्याची तुलना धोनीशी केली जात आहे. प्रत्येक मॅचमध्ये कमाल दिल्लीकर असलेल्या बदोनीनं गुजरात जायंट्स विरूद्ध पदार्पणातील मॅचमध्येच अर्धशतक केले होते. त्या मॅचमध्ये बदोनी बॅटींगला आला तेव्हा 4 आऊट 29 अशी लखनऊची बिकट अवस्था होती. त्यानंतर त्यानं 41 बॉलमध्ये 54 रनची खेळी केली. बदोनीनं त्या खेळीत 4 फोर आणि 3 सिक्स लगावले. लखनऊनं ती मॅच गमावली असली तरी बदोनीच्या खेळाची खूप प्रशंसा झाली. DC Vs LSG : पृथ्वी शॉ आला, त्याने अर्धशतक ठोकले अन् वॉर्नर पाहत राहिला त्यानंतर सनरायझर्स हैदाराबाद विरूद्ध त्यानं 12 बॉलमध्ये 19 रन काढले. लखनऊनं ती मॅच 12 रनच्या निसटत्या फरकानं जिंकली होती. लखनऊचा कॅप्टन केएल राहुलनं दिल्लीच्या विजयानंतर बदोनीचं कौतुक केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात