मुंबई, 7 एप्रिल : इंडियन प्रीमियर लीगच्या ( Indian Premier League ) पंधराव्या हंगामातील पंधरावा सामना लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ( Lucknow Super Giants vs Delhi Capitals ) संघात होत आहे. लखनौ सुपरजायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी दिल्लीने सध्या 13.1 षटकांत 87 धावा केल्या. तर दिल्लीचे 3 गडी बाद झाले आहेत. मात्र, याचवेळी नवोदित पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) दमदार खेळी केली.
त्याने अर्धशतक ठोकले अन्...
प्रथम फलंदाजी करताना दिल्लीकडून पृथ्वी शॉने दमदार अर्धशतक ठोकले. तरी प्रसिद्ध क्रिकेटपटू डेविड वार्नर (David Warner) हा फक्त 3 धावा करुन बाद झाला. नवोदित पृथ्वी शॉने 34 चेंडूंत 61 धावा केल्या. या 9 चौकार तर 2 षटकारांचा समावेश आहे. त्याला के. गौतमने बाद केले. तर तेच दुसरीकडे वार्नर हा तब्बल 12 चेंडू खेळला. मात्र, त्याने फक्त 4 धावा केल्या.
हेही वाचा - LSG vs DC Dream 11 Team Prediction : 'या' 11 खेळाडूंवर आजमवा तुमचं भविष्य
या दोन्ही संघांपैकी दिल्ली संघाचे आतापर्यंत दोन सामने झाले आहेत. त्यापैकी एक सामना जिंकला आहे, तर एक सामना गमावला आहे. तसेच लखनौ सुपरजायंट्स संघाचे तीन सामने झाले आहेत, त्यापैकी एका सामन्यात पराभव, तर दोन सामन्यात विजय मिळवला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Ipl, T20 cricket