मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2022 : गंभीरचा मास्टरस्ट्रोक धोनीवर भारी! मॅच जिंकल्यानंतरची प्रतिक्रिया Viral

IPL 2022 : गंभीरचा मास्टरस्ट्रोक धोनीवर भारी! मॅच जिंकल्यानंतरची प्रतिक्रिया Viral

लखनऊ विरूद्ध चेन्नई मॅचकडे सीएसकेचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आणि लखनऊचा मेंटॉर गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यातील लढत म्हणूनही पाहिलं जात होतं. गौतम गंभीरनं शेवटच्या क्षणी खेळलेल्या मास्टरस्ट्रोकमुळे चेन्नईचा पराभव झाला.

पुढे वाचा ...

मुंबई, 1 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) गुरूवारी झालेल्या मॅचमध्ये लखनऊ सुपर जायंट्सनं चेन्नई सुपर किंग्सचा (LSG vs CSK) 6 विकेट्सनं पराभव केला. या मॅचमध्ये चेन्नईनं पहिल्यांदा बॅटींग करत 7 आऊट 210 रन केले होते. लखनऊनं 211 रनचं टार्गेट शेवटच्या ओव्हरमध्ये पूर्ण केलं. लखनऊ विरूद्ध चेन्नई मॅचकडे सीएसकेचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आणि लखनऊचा मेंटॉर गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यातील लढत म्हणूनही पाहिलं जात होतं. गौतम गंभीरनं शेवटच्या क्षणी खेळलेल्या मास्टरस्ट्रोकमुळे चेन्नईचा पराभव झाला.

लखनऊला विजयासाठी 16 बॉलमध्ये 40 रन हवे होते. त्यावेळी 18 व्या ओव्हरमध्ये दीपक हुड्डा आऊट झाला. हुड्डा आऊट झाल्यानंतर अनुभवी खेळाडू म्हणून कृणाल पांड्या (Krunal Pandya) बॅटींगला येईल, असा सर्वांचा अंदाज होता. पण गंभीरनं नवोदीत आयुष बदोनीला (Ayush Badoni) बॅटींगसाठी पाठवलं. लखनऊच्या टीममध्ये 'बेबी एबी' या नावावं बदोनी प्रसिद्ध आहे. दिल्लीच्या या तरूण खेळाडूनं कमी कालावधीत गंभीरचा विश्वास संपादन केला आहे.

बदोनी या आयपीएलमध्ये पहिल्यांदाच खेळत असल्यानं त्याचा खेळ देखील धोनी किंवा सीएसकेच्या अन्य खेळाडूंना माहिती नव्हता. त्यामुळेच ऑल राऊंडर कृणालच्या ऐवजी स्पेशालिस्ट बॅटर असलेल्या बदोनीला पाठवण्याची चाल गंभीरनं खेळली. गंभीरची ही चाल मास्टरस्ट्रोक ठरली. त्याने एव्हिन लुईससोबत (Evin Lewis) पाचव्या विकेटसाठी 19 बॉलमध्ये नाबाद 40 रनची भागिदारी करत लखनऊच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

PAK vs AUS : बाबर आझमचा वर्ल्ड रेकॉर्ड, पाकिस्ताननं केला ऑस्ट्रेलियाचा पराभव

लुईस चेन्नईच्या बॉलर्सची धुलाई करत असताना बदोनीनंही त्याच्या खांद्याला खांदा लावून खेळ केला. बदोनीनं 9 बॉलमध्ये 2 सिक्सच्या मदतीनं नाबाद 19 रन केले. बदोनीनं शेवटच्या ओव्हरमध्ये सिक्स लगावत सीएसकेच्या स्कोरची बरोबरी केली. त्यावेळी डग आऊटमध्ये बसलेल्या गंभीरनं उभं राहून सेलिब्रेशन केलं. गंभीरचं हे सेलिब्रेशन चांगलंच व्हायरल झालं आहे.

आयपीएल स्पर्धेतील नवोदीत टीम असलेल्या लखनऊ सुपर जायंट्सनं (Lucknow Super Giants) पहिल्या विजयाची नोंद केली आहे. त्यांचा यापूर्वीच्या मॅचमध्ये गुजरात टायटन्सनं पराभव केला होता. तर चेन्नई सुपर किंग्सचा हा स्पर्धेतील सलग दुसरा पराभव आहे.

First published:

Tags: Csk, Gautam gambhir, Ipl 2022, Lucknow Super Giants, MS Dhoni