मुंबई, 1 एप्रिल : बाबर आझम (Babar Azam) आणि इमाम उल हक (Imam ul Haq) यांच्या शतकाच्या जोरावर पाकिस्ताननं ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्सनं पराभव केला. लाहोरमध्ये गुरूवारी झालेल्या दुसऱ्या वन-डेमध्ये ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदा बॅटींग करत 8 आऊट 348 रन केले होते. पाकिस्ताननं 349 रनचं टार्गेट 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. या विजयासह पाकिस्ताननं 3 सामन्यांच्या वन-डे मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. बाबरचा रेकॉर्ड बाबर आझमनं यावेळी वन-डे करिअरमधील 15 वं शतक केले. त्याने 83 बॉलमध्ये 11 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीनं 114 रन केले.बाबरनं 83 वन-डेमध्ये 15 शतक पूर्ण केले आहेत. वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 15 शतक करण्याचा रेकॉर्ड त्यानं यावेळी केला. बाबरनं दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमलाला मागं टाकलं. त्यानं 86 मॅचमध्ये 15 शतक झळकावले होते. बाबर आणि इमाम यांनी दुसऱ्या विकेटसाठी 111 रनची भागिदारी केली. त्यापूर्वी इमामनं फखर जमां (67) सोबत पहिल्या विकेटसाठी 118 रनची भागिदारी करत पाकिस्तानच्या विजयाचा पाया रचला. इमामनं या मालिकेतील सलग दुसरे शतक झळकाले. तो 97 बॉलमध्ये 107 रन काढून आऊट झाला.
A stunning win for Pakistan.
— ICC (@ICC) March 31, 2022
Centuries for Imam-ul-Haq and Babar Azam help them chase down 348 with an over to spare.
Watch #PAKvAUS live on https://t.co/CPDKNxoJ9v (in select regions) 📺 | 📝:https://t.co/x6oj01SOzk pic.twitter.com/QcLGdE0boZ
ऑस्ट्रेलियाची विक्रमी धावसंख्या यापूर्वी ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदा बॅटींग करत पाकिस्तानमध्ये वन-डे क्रिकेटच्या इतिहासात सर्वात मोठा स्कोर केला. यापूर्वी ऑस्ट्रेलियानं 1998 साली पाकिस्तान विरूद्ध कराची वन-डेमध्ये 8 आऊट 324 रन केले होते. ऑस्ट्रेलियाकडून चौथीच आंतरराष्ट्रीय वन-डे मॅच खेळणाऱ्या बेन मॅकडरमॉटनं शतक झळकावले. त्याने 108 बॉलमध्ये 10 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीनं 104 रन केले. जडेजाच्या कॅप्टनसीत धमक दिसेना; नव्या टीमनं CSKवर नोंदवला थरारक विजय मॅकडरमॉटनं ट्रेविस हेडसोबत (89) दुसऱ्या विकेटसाठी 162 रनची भागिदारी केली. त्यानंतर मार्नस लाबुशेन (59) आणि मार्कस स्टॉईनिस (49) रन करत ऑस्ट्रेलियाला मोठा स्कोर उभा करून दिला. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीनं सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. या मालिकेतील पहिली वन-डे ऑस्ट्रेलियानं जिंकली होती. तर दुसरी वन-डे पाकिस्ताननं जिंकत मालिकेत बरोबरी साधली आहे. आता तिसरी आणि निर्णायक वन-डे शनिवारी होणार आहे.