जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022, LSG vs CSK : चेन्नईच्या टीममध्ये होणार मोठा बदल, वाचा Moeen Ali साठी कुणाला काढणार बाहेर?

IPL 2022, LSG vs CSK : चेन्नईच्या टीममध्ये होणार मोठा बदल, वाचा Moeen Ali साठी कुणाला काढणार बाहेर?

IPL 2022, LSG vs CSK : चेन्नईच्या टीममध्ये होणार मोठा बदल, वाचा Moeen Ali साठी कुणाला काढणार बाहेर?

चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) आयपीएल 2022 मधील पहिल्या सामन्यात पराभव झाला होता. या पराभवानंतर आज (गुरूवार) होणाऱ्या मॅचमध्ये विजय मिळवत पॉईंट टेबलमध्ये खातं उघडण्याचा सीएसकेचा प्रयत्न असेल.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 31 मार्च : चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) आयपीएल 2022 मधील पहिल्या सामन्यात पराभव झाला होता. या पराभवानंतर आज (गुरूवार) होणाऱ्या मॅचमध्ये विजय मिळवत पॉईंट टेबलमध्ये खातं उघडण्याचा सीएसकेचा प्रयत्न असेल. सीएकेची दुसरी मॅच लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) विरूद्ध होत आहे. या मॅचमध्ये जोरदार कमबॅक करण्याचा रविंद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) टीमचा प्रयत्न असेल. लखनऊ विरूद्धच्या मॅचमध्ये सीएसकेमध्ये एक मोठा बदल होणार आहे. या मॅचमध्ये ऑल राऊंडर मोईन अली (Moeen Ali) खेळणार हे नक्की आहे. व्हिसा वेळेवर न मिळाल्यानं मोईनला पहिल्या मॅचमध्ये संधी मिळाली नाही. आता लखनऊ विरूद्ध तो प्लेईंग 11 मध्ये खेळणार हे नक्की आहे. मोईन अलीला डावखुरा स्पिनर मिचेल स्टँनरच्या जागी संधी मिळू शकते. चेन्नईच्या टीममध्ये अन्य कोणता बदल होण्याची शक्यता नाही. सीएसके मॅनेजमेंटनं स्टँनरला खेळवण्याचा निर्णय घेतला तर डेवॉन कॉनवेला वगळलं जाऊ शकतं. कॉनवे केकेआर विरूद्ध फ्लॉप ठरला होता. मोईन अली टॉप ऑर्डरचा बॅटर आहे. मागील सिझनमध्ये त्याने 15 मॅचमध्ये 357  रन केले होते. तसंच 6 विकेट्सही घेतल्या. तर, कॉनवेनं केकेआर विरूद्ध झालेल्या मॅचमध्ये फक्त 3 रन काढले होते. चेन्नईच्या बॅटर्सनी पहिल्या मॅचमध्ये निराशा केली होती. महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) आयपीएल 2019 नंतर झळकावलेल्या अर्धशतकामुळे टीमची लाज वाचली होती. आता मोईन अली टीममध्ये परतल्यानं टॉप ऑर्डरला बळकटी येईल असा फॅन्सना विश्वास आहे. IPL 2022: KKR ने पराभवानंतर केलं भयंकर Tweet, फॅन्सना आठवला आर्यन! चेन्नई सुपर किंग्सची संभाव्य Playing 11 : ऋतुराज गायकवाड, डेवॉन कॉनवे, मोईन अली, रॉबीन उथप्पा, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रविंद्र जडेजा (कॅप्टन), महेंद्रसिंह धोनी, ड्वेन ब्राव्हो, अ‍ॅडम मिल्ने आणि तुषार देशपांडे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात